औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, ‘लव्ह औरंगाबाद’ फलकाची तोडफोड

औरंगाबादमधील 'लव्ह औरंगाबाद' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. (Love Aurangabad Board Vandalized )

औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, 'लव्ह औरंगाबाद' फलकाची तोडफोड
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 11:50 AM

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये शहराच्या नावावरून वाद पुन्हा पेटला आहे. लव्ह औरंगाबाद या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. औरंगाबद शहराच्या नावावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते.(Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

लव्ह औरंगबाद सेल्फी पॉईंटची तोडफोड

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून शहराच्या नावाच्या वादानं तोंड वर काढलं आहे. शहरातील छावणी परिसरात लव्ह औरंगाबाद हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. (Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

लव्ह औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर वाद

स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.

खासदार इम्तियाज जलील यांची टीका

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. इम्तियाज जलील यांनी ट्विटर पोस्ट टाकत शिवसेना चिप राजकारण करत असल्याचा आरोप केलेला. दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्य शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तीस वर्षात महापालिकेने शहरासाठी केलेले रचनात्मतक काम दाखवण्यासाठी नसल्यामुळं ते शहराच्या नावाचे राजकारण करत आहेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार असं वक्तव्य पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 9 डिसेंबरला केले होते. सुभाष देसाई औरंगाबादला विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली होती.

संबंधित बातम्या:

औरंगाबादच्या नामकरणाचा पुन्हा वाद , MIMचं शिवसेनेवर टीकास्त्र

Subhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य

(Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.