नागपूर : नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक (LPG cylinder Gas Leaked) झाल्याने शेजारी असलेली तीन घरे जळून खाक झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात ही भयानक घटना आज सकाळच्या सुमारास घडली (LPG cylinder Gas Leaked Fire Destroyed Three Houses In Nagpur).
काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात सकाळी 6 च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली. पाहता पाहता ही आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली.
या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुर्दैवाने विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे आणि खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार रुपये देखील या आगीत जळून खाक झाले आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार या आगीत तब्बल 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश होता. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमीhttps://t.co/2LBYmAHMM2#Oxygencylinderexplosion #Lucknow #KatyOxygenPlant #Oxygen #UP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
LPG Cylinder Gas Leaked Fire Destroyed Three Houses In Nagpur
संबंधित बातम्या :
डोंबिवलीत कामगार वसाहतीत सिलेंडर स्फोट; भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर