‘शिंदे घराणं संपवण्यासाठी पवारांकडून संजय शिंदेंना उमेदवारी’

पंढरपूर: “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभेतून माघार घेणे हे भारतीय जनता पक्षाचे यश आहे. शिंदे घराण्याला संपवण्यासाठी शरद पवारांनी माढ्यातून संजय शिंदे यांना  उमेदवारी दिली आहे”, असा बेधडक आरोप भाजप नेते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला. ते पंढरपुरात बोलत होते. पंढरपुरातील वाडीकुरोली इथे भाजपचा विजयी संकल्प मेळावा आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव […]

'शिंदे घराणं संपवण्यासाठी पवारांकडून संजय शिंदेंना उमेदवारी'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पंढरपूर: “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभेतून माघार घेणे हे भारतीय जनता पक्षाचे यश आहे. शिंदे घराण्याला संपवण्यासाठी शरद पवारांनी माढ्यातून संजय शिंदे यांना  उमेदवारी दिली आहे”, असा बेधडक आरोप भाजप नेते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला. ते पंढरपुरात बोलत होते.

पंढरपुरातील वाडीकुरोली इथे भाजपचा विजयी संकल्प मेळावा आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांचा भाजपा प्रवेश सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. काँग्रेस नेते कल्याण काळे यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेचे  माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, माजी नगराध्यक्ष सुरेखा दिलीप पवार यांचाही भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शैलीत भाषण करत, विरोधकांवर हल्लाबोल केला. भाजप कुणाच्या मालकीची पार्टी नाही. कार्यकर्त्यांच्या मालकीची पार्टी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर आपण दिल्लीचं तिकीट काढून ठेवा. आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

“आम्ही जर मदत केलेल्या नेत्यावर दबाव टाकला तर निम्मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी रिकामी होईल”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यावर निशाणा साधला. भाजपने मदत केल्याने संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनल्याचा दावा भाजपचा आहे. त्याला उद्देशून मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढवला.

दबाव टाकल्यास सांगा मी सरकारच्या लाभार्थी लोकांची यादी जाहीर केली तर अनेक शीर्षस्थानी नेत्यांची नावं समोर येतील. रावणराज संपलेलं आहे. दबाव कोणी टाकला तर सांगा एका रात्रीत काय होतं कळेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

भाजपात येणारे लोक शेतकरी,  लोकांची कामं घेऊन येत आहेत. स्वतः साठी येत नाहीत. साखर कारखानदारीसाठी जेवढ्या सवलती, निर्णय मोदींनी घेतले तेवढे जाणते राजे सत्तेत असताना घेऊ शकले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना लगावला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.