निवडणुकीआधी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; राऊतांविरोधात गुन्हा दाखल

Case Registered Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

निवडणुकीआधी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; राऊतांविरोधात गुन्हा दाखल
संजय राऊत
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 12:00 PM

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात घडामोडींना वेग आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत विरोधात गुन्हा झाला आहे.

राऊतांविरोधात तक्रार दाखल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरून सरकारवर टीका केली. मध्यप्रदेशमध्ये ही योजना बंद पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर राऊतांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला. भाजप महिला मोर्चाने याबाबत तक्रार केली.

तक्रारीत काय?

भोपाळमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांनी संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवली. जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असं सुभाषा चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हणण्यात आलं आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय?

भोपळ गुन्हा झाल्यानंतर आज जेव्हा संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊतांनी प्रतिसवाल केला आहे. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे… मी काय चुकीचे बोललो आहे? जेव्हा आम्हाला कोर्टात बोलतील. तेव्हा आम्ही सांगू… उत्तर प्रदेशमध्ये खरोखर ‘लाडली बहन’ची काय स्थिती आहे की त्यांनी जाहीर केली पाहिजे. महाराष्ट्रात लाडकी बहिणीच्या नावाखाली फसवा फसवी सुरू आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी योजना आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.