गणेशोत्सवादरम्यान मेट्रोच्या जादा फेऱ्या,अंधेरी आणि गुंदवली स्थानकातून शेवटच्या मेट्रो वेळेत रात्री अर्धा तास वाढ

मुंबईतील गणेश भक्तांच्या सोयीसाठी बेस्टच्या पाठोपाठ आता मेट्रोने देखील जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवादरम्यान मेट्रोच्या जादा फेऱ्या,अंधेरी आणि गुंदवली स्थानकातून शेवटच्या मेट्रो वेळेत रात्री अर्धा तास वाढ
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 8:05 PM

बेस्टच्या पाठोपाठ आता महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने ( एमएमएमओसीएल ) देखील गणेशोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनच्या वाढीव फेऱ्या चालविणार आहे.गणेशोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात अंधेरी ( पश्चिम )आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी रात्री 11.30 वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत मुंबईत गणेश दर्शनासाठी फिरणाऱ्या भाविकांना आपापल्या घरी पोहचता यावे,यासाठी हा निर्णय घेतला आहे.

विस्तारित सेवांचा तपशील:

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ 30 मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे.

दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री 11.15 आणि 11.30 वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व)आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील.

या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण 20 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

१. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री 10:20, 10:39, 10:50 आणि 11 वाजता (4 फेऱ्या )

२. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री 10:20, 10:40, 10:50 आणि 11 वाजता (4 फेऱ्या )

३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2 फेऱ्या )

४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2 फेऱ्या )

५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री 10:53, 11:12, 11:22 आणि 11:33 वाजता (4 फेऱ्या )

६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री 10:57, 11:17, 11:27 आणि 11:36 वाजता (4 फेऱ्या )

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.