महाराष्ट्राला काहीसा दिलासा, 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात एकही रुग्ण नाही
देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी महाराष्ट्राला काहिसा दिलासा मिळाला आहे (Corona Patient in Maharashtra district).
मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी महाराष्ट्राला काहिसा दिलासा मिळाला आहे (Corona Patient in Maharashtra district). मागील 3 दिवसांमध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण सापडलेला नाही. स्वतः आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली आहे. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्वांकडून सर्व जिल्ह्याचा आढावा घेत उपाययोजनांची माहिती घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर संबंधित सचिवही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना संसर्गाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. यात अगदी राज्याचा नकाशा समोर ठेऊन कोठे काय स्थिती आहे हे सांगण्यात आले. यात केलेल्या महत्त्वाच्या विश्लेषणानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे हे जिल्हे कोरोनाचे मोठे 5 हॉटस्पॉट जिल्हे आहेत. असं असलं तरी मागील 3 दिवसात राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये एकही नवं कोरोना संसर्गाचं प्रकरण समोर आलेलं नाही. या 11 जिल्ह्यांमध्ये सांगली, बुलढाणा, उस्मानाबाद, चंद्रपूर, जालना, वाशिम, गोंदिया, सिंधुदुर्ग, बीड परभणी, नांदेड, भंडारा, गडचिरोली आणि वर्ध्याचा समावेश आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज (26 एप्रिल) दुपारी जनतेशी संवाद साधत कोरोनाशी लढण्यासाठी सुरु असलेल्या राज्याच्या तयारीचीही माहिती दिली. तसेच आपण कोरोनाशी लढण्यासाठी तयार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी जनतेला दिला. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून जे काही वातावरण होत आहे, नक्की काय होणार, आकडे फिरतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या शेवटी देशात एवढे रुग्ण होणार, महाराष्ट्रात एवढे रुग्ण होतील. मुंबईत एवढे रुग्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत काय तयारी केली आहे, त्यासाठी काही फोटो दाखवत आहे. हे फोटो दाखवल्यावर घाबरुन जाऊ नका.”
“आपण जी काही मोठी तयारी करत आहोत, त्याचे हे काही फोटो आहेत. जर समजा उद्या काही मोठी वाढ झाली तर काय, त्यामुळे गोरेगावच्या नेस्को ग्राऊंड, वरळी च्या एनएससीआय या ठिकाणी ही तयारी केली आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
परराज्यातील मजुरांना नक्की घरी पाठवू, पण ट्रेन सुरु करणार नाही : मुख्यमंत्री
‘या’ आवाहनाबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले!
Corona Patient in Maharashtra district