Maharashtra Assembly Election Results 2024 : अचलपूरात धक्कादायक निकाल, बच्चू कडू यांचा पराभव

Achalpur Election Results 2024 : महायुतीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महायुतीचे उमेदवार १२५ हून अधिक जागांवर पुढे आहेत. तर दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार ५६ जागांवर पुढे असून एका जागेवर विजय झाला आहे. तर अजितदादा गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी खूपच मागे पडली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024 : अचलपूरात धक्कादायक निकाल, बच्चू कडू यांचा पराभव
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 2:20 PM

महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल ( २३ नोव्हेंबर ) अखेर आज शनिवारी जाहीर होत आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. राज्यातील २८८ विधानसभा निवडणूकीसाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. आता एकामागोमाग निकाल जाहीर होत आहेत. अचलपूर येथून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुती सोबत येणे पसंद केले होते. परंतू महायुती आघाडीत राहूनही बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करणे सुरुच ठेवले होते. लोकसभा निवडणूकीच्या वेळी देखील बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करीत त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा लोकसभेत नंतर पराभव झाला होता.

बच्चू कडू यांचा पराभव

आता विधानसभा निवडणूकीत अचलपूर येथून बच्चू कडू यांचा अनपेक्षित  धक्कादायक  पराभव झाला आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय झाला असून ते १८,४८२ मतांनी आघाडीवर आहेत. साल २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत अचलपूर मध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांचा विजय झाला होता.

हे सुद्धा वाचा

महायुतीचा झंझावात

महायुतीला विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे उमेदवार सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर आहेत. महायुतीचे उमेदवार १२५ जागांवर पुढे आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार ५६ जागांवर पुढे आहेत.तर राष्ट्रवादी अजितदादा यांच्या गटाचे उमेदवार ३९ जागांवर पुढे आहेत. भाजपाचे दोन उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे एक, अजितदादा गटाचे दोन उमेदवारांचा विजय जाहीर करण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.