लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभेत भाजपची सावध खेळी, 10 मराठा उमेदवारांना संधी? पाहा संपूर्ण यादी

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये १० मराठा आणि १३ महिला उमेदवार आहेत. यामुळे राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभेत भाजपची सावध खेळी, 10 मराठा उमेदवारांना संधी? पाहा संपूर्ण यादी
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 11:30 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपने एक पाऊल पुढे टाकत सर्वात आधी विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून नागपूर द. पश्चिमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेली ही यादी जवळपास ९९ जणांची असून यात भाजपने एक मोठी खेळी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांचा फटका बसल्यानतंर आता विधानसभेत भाजपने 10 मराठा उमेदवारांना संधी दिली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यातून एक, दोन नव्हे तर तब्बल 10 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील इतर 6 जागांवर विविध जातीतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

भाजपचे 10 मराठा उमेदवार कोण?

  • श्रीजया चव्हाण – भोकर
  • राजेश पवार – नायगाव
  • तानाजी मुटकुळे – हिंगोली
  • मेघना बोर्डीकर – जिंतूर
  • बबनराव लोणीकर – परतूर
  • संतोष दानवे – भोकरदन
  • अनुराधा चव्हाण- फुलंब्री
  • संभाजी निलंगेकर – निलंगा
  • अभिमन्यू पवार – औसा
  • राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर

भाजपकडून इतर जातीच्या कोणत्या उमेदवारांना संधी

  • तुषार राठोड – मुखेड (ओबीसी)
  • भीमराव केरम- किनवट (एसटी)
  • नमिता मुदंडा – केज (एसी)
  • अतुल सावे – संभाजीनगर पूर्व (ओबीसी)
  • प्रशांत बंब – गंगापूर (मारवाडी)
  • नारायण कुचे – बदनापूर (एसी)

13 महिलांना उमेदवारी घोषित

पहिल्या यादीत भाजपनं 13 महिलांना संधी दिली आहे. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, पर्वतीत माधुरी मिसाळ, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीमधून अनराधा चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापुरातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्वेतून सुलभा गायकवाडांना उमेदवारीची संधी मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.
मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून मराठा उमेदवारांना संधी
मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून मराठा उमेदवारांना संधी.
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 'या' 37 उमेदवारांना संधी, बघा संभाव्य यादी
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 'या' 37 उमेदवारांना संधी, बघा संभाव्य यादी.
सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद तर महायुतीत मावळच्या जागेवरून जुंपली
सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद तर महायुतीत मावळच्या जागेवरून जुंपली.
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?.
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार.
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.