‘रात्रीस खेळ चाले…’ माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार, खासदार मध्यरात्री जरांगे पाटलांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

'रात्रीस खेळ चाले…' माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार, खासदार मध्यरात्री जरांगे पाटलांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 4:23 PM

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्राती विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

माजी मुख्यमंत्र्याच्या सूनेने घेतली भेट

दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई संगीता निलंगेकर यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसकडून निलंगा विधानसभेसाठी त्यांचे पती अशोकराव निलंगेकर इच्छुक होते. मात्र निलंग्याची जागा काँग्रेसकडून अभय साळुंके यांना सुटल्याने संगीता निलंगेकर नाराज आहेत. यामुळे संगीता निलंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षाही व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील आणि संगीता निलंगेकर यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

माजी खासदार शिवाजीराव माने जरांगे पाटलांच्या भेटीला

हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव माने यांनी भाजपातून छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. माजी खासदार शिवाजीराव माने कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहेत. कळमनुरी मतदारसंघात गावागावात माझा कार्यकर्ता आहे. मनोज जरांगे पाटील यांच आदेश असेल तर मला विजयाची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिली.

भाऊराव पाटील गोरेगावकर, माधवराव पाटील जळगावकर यांनीही घेतली भेट

हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. हिंगोली विधानसभेची जागा वाटाघाटीत ठाकरे शिवसेनेच्या रूपाली पाटील गोरेगावकर यांना सुटल्याने भाऊराव पाटील गोरेगावकर नाराज झाले आहेत. यामुळे भाऊराव पाटील यांनी हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

मी आज बैठक घेतली आणि लोकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. याच बैठकीत ठरलं की अर्ज भरल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यायची. यानंतर मी भेट घ्यायला आलो. काँग्रेस जिल्ह्यात तीन विधानसभा आहेत. समान वाटा मिळाला पाहिजे होता मात्र तो मिळाला नाही, असे भाऊराव पाटील म्हणाले.

हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माधवराव पाटील जळगावकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या संघर्षात मी सोबत होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला शासनाने विश्वासात करण्याचं काम केलं आहे. जेव्हा पदयात्रा निघाली होती तेव्हा अध्यादेश एक दिला आणि सभागृहात ठराव एक मांडला. पक्षाने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला. पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी घोषित झाली. पुढचा उमेदवार कोण राहील याची आम्हाला काळजी नाही. शिंदे गटाचा कोणीही उमेदवार असला तरी आम्ही जमिनीवर असल्यामुळे लोकांमध्ये असल्यामुळे आम्हाला भीती नाही, अशी प्रतिक्रिया आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी दिली.

काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

तसेच नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. आज काँग्रेसकडून नांदेड दक्षिणसाठी त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी पक्ष श्रेष्ठींचे आभार मानतो. मराठा आरक्षण मिळावं यासाठी मी सभागृहात सुद्धा प्रश्न मांडला आहे. माझं पहिले यादीत नाव होतं. मात्र इतर जागा निश्चित झाल्या नसल्याने माझं नाव ठेवलं होतं, असे मोहन हंबर्डे यांनी म्हटले.

दरम्यान एकीकडे अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत असताना दुसरीकडे मराठा बांधवांकडून गावोगावी घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहे. सातारा जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून गावोगावी घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहेत. या बैठकांमध्ये कुणबी नोंदणीच्या बाबत मार्गदर्शन केले जात आहेत, कुणबी दाखले काढून घ्यावेत असे आवाहन या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. या घोंगडी बैठकीला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र येत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भेटीगाठी महत्त्वाच्या का?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना अनेक नेते भेटत आहेत. हे सर्व नेते आगामी विधानसभा निवडणूक आणि मराठा मतं याबद्दल प्रामुख्याने चर्चा करताना दिसत आहेत. सध्या जे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्या नेत्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील पॅटर्न चालत आहे. त्यामुळे या भेटीगाठी महत्त्वाच्या असल्याचे बोललं जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.