टीव्ही 9 रिपोर्टर पोलमध्ये कोण सरस? शरद पवार की अजित पवार? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?; आकड्यांनी कुणाची उडवली झोप?

टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टीव्ही 9 रिपोर्टर पोलमध्ये कोण सरस? शरद पवार की अजित पवार? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?; आकड्यांनी कुणाची उडवली झोप?
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 8:48 PM

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान आज पार पडले. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. आज झालेल्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच ‘टीव्ही 9 रिपोर्टर’ पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यानंतर आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही 9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय?

आता ‘टीव्ही 9 रिपोर्टर’ पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज पाहायला मिळत आहे.  तर इतर अपक्षांना 13 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 80 पेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 23 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे.

तर महाविकासआघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला 50 पेक्षा अधिक जागांवर यश मिळू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला जात आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 पेक्षा अधिक जागा आणि ठाकरे गटाला44 पेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 ते 23 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

🔹टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार

💠महायुती – 129 ते 139 जागा

  • भाजप – 80 पेक्षा अधिक जागा
  • शिवसेना शिंदे गट – 25 पेक्षा अधिक जागा
  • अजित पवार गट – 23 पेक्षा अधिक जागा

💠महाविकासआघाडी 136-145

  • काँग्रेस 50 पेक्षा अधिक जागा
  • ठाकरे गट 44 पेक्षा अधिक जागा
  • शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागा

💠इतर : 13 ते 23 जागा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.