Ghatkopar East Vidhan Sabha : भाजपची अपराजित सीट, पराग शाहांना पुन्हा मिळणार का संधी ? कोणाची जादू चालणार ?
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी एक आहे . हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे . गेल्या वेळच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे पराग शाह हे या मतदारसंघातून विजयी झाले होते.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरनंतर आता लवकरच महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील पक्षांसह राज्यातील इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातही निवडणुकीची तयारी साठी सर्वांनीच कंबर कसली आहे. घाटकोपर पूर्व ही ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येते. त्यात विधानसभेच्या 6 जागा आहेत. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. यंदाही भाजप हा विजयाचा सिलसिला कायम ठेवतो की महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांची विजयी श्रृंखला तोडण्यात यशस्वी ठरतात पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही विधानसभा जागा मुंबई उपनगराअंतर्गत येते आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या भागात अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 23 हजार 784 आहे तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 1,802 आहे .
घाटकोपर पूर्व मतदारसंघात किती मतदार ?
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या15 हजाप 651 इतकी आहे. तर ग्रामीण मतदारांची संख्या 0 आहे. शहरी मतदारांबद्दल बोलायचं झालं तर इथल्या मतदारांची संख्या 2 लाख 37 हजार 131 इतकी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात 53.39% मतदान झालं होतं.
2019 मध्ये तत्कालीन आमदारांचा पत्ता कट
2019 मध्ये भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी न देता त्यांचं तिकीट कापून बांधकाम उद्योजक पराग शाह यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शाह यांनी नाराज कार्यकर्त्यांना मनवून आणि प्रचाराचा धडाका लावत या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. त्यांना 73,054 मतं मिळाली तर मनसेचे सतीश सीताराम पवार हे दुसऱ्या स्थान होते, त्यांना 19 हजार 735 मतं मिळाली. शाह यांनी पवार यांचा तब्बल 53 हजार 319 मतांनी पराभव केला.
पराग शाह कोण आहेत ?
पराग शाहा हे घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार आहे. 2019 साली त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मूळचे उद्योजक असलेल्या शाह यांच्याकडे 500 कोटींहून अधिक संपत्ती आहे, त्याची निवडणूक प्रतिज्ञापत्रात नोंद आहे.
2009 पासून घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार.
2009 पासून या मतदारसंघावर भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. यंदाही भाजप हा विजयाचा सिलसिला कायम ठेवतो की महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांची विजयी श्रृंखला तोडण्यात यशस्वी ठरतात पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
2019 विधानसभा निवडणूक : पराग शाह , भाजप
2014 विधानसभा निवडणूक : प्रकाश मेहता , भाजप
2009 विधानसभा निवडणूक : प्रकाश मेहता , भाजप