“मी उपमुख्यमंत्री होणारच…” कोल्हापुरातील बड्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले “राज्याला तिसरा…”

गेली 25 वर्षे तुम्ही मला निवडून देताय, त्यातील 19 वर्षे तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आता पुढची पाच वर्ष मला संधी दिली तर मी तुमचा हमाल म्हणून काम करेन", असे हसन मुश्रीफ म्हणाले.

मी उपमुख्यमंत्री होणारच... कोल्हापुरातील बड्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले राज्याला तिसरा...
हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 4:01 PM

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कागल विधानसभा मतदरासंघातून महायुतीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शरद पवारांकडून समरजितसिंह घाटगे यांना तिकीट देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

“मी तुमचा हमाल म्हणून काम करेन”

हसन मुश्रीफ यांनी आज कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाषण केले. “मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. पण माझा फॉर्म भरायला इतकी गर्दी याआधी कधीच पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक माझ्या या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. गेली 25 वर्षे तुम्ही मला निवडून देताय, त्यातील 19 वर्षे तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आता पुढची पाच वर्ष मला संधी दिली तर मी तुमचा हमाल म्हणून काम करेन”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

“राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?”

“विक्रम सिंह घाटगे यांनी काढलेला शाहू मिल्क बंद पाडणे म्हणजे शाश्वत विकास आहे का? शाहू कारखाना कर्जात घालवणे म्हणजे तुमचा शाश्वत विकास आहे का? मला तुमचे पुढचे 21 दिवस द्या, मी तुम्हाला माझं काळीज देईन. जर पुन्हा निवडून आलो तर मी मुख्यमंत्री होणार नाही. पण उपमुख्यमंत्री नक्की होईन. काही राज्यात दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?” असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

“तर घरात जास्त उंदीर फिरतात”

“जर मला एवढं सगळं मला मिळणार असेल, तर आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य देखील झाला नाही, त्याला मत देऊन आपलं मत फुकट घालवू नका. आज फार मोठी मिरवणूक झाले म्हणून घरी जाऊन झोपू नका. मला एक लाखाचं मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडं करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात”, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.