Maharashtra Breaking News LIVE : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| Updated on: Nov 19, 2024 | 10:00 AM

Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला संपला आहे. आज 19 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Nov 2024 10:00 AM (IST)

    माजी गृहमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न – संजय राऊत

    गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. फडणवीस मिंधे यांच्या काळात हे घडतंय

  • 19 Nov 2024 09:49 AM (IST)

    मुंबई – मतदानाच्या तयारीला सुरवात

    मुंबई – निवडणुकीसाठी मतदानाच्या तयारीला सुरवात.  उद्या राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे.

    वरळी विधानसभेच्या मतदानकरिता नेहरु सायन्स सेंटर मधे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात येत आहे

  • 19 Nov 2024 09:30 AM (IST)

    अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    नागपूर – काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू.

  • 19 Nov 2024 09:21 AM (IST)

    राजधानी दिल्लीतील अनेक भागांतील एअर क्वालिटी इंडेक्स 500 वर, हवा अती गंभीर श्रेणीमध्ये

    राजधानी दिल्ली बनली गॅस चेंबर,  अनेक भागातला एअर क्वालिटी इंडेक्स हा 500 च्या वर पोहोचला आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हवा अति गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली असून आता दहावी बारावीचे क्लास ऑनलाइन होणार आहेत तर पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    प्रदूषणा संदर्भातील श्रेणी चार न हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असून बी एस फोर डिझेल गाड्यांना दिल्लीत पूर्णपणे बंदी आहे.

  • 19 Nov 2024 09:15 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी जावेद अख्तर यांना दिला, अखेर निर्दोष सुटका

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका झाली आहे.

    साल 2021 मध्ये एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.

  • 19 Nov 2024 09:08 AM (IST)

    मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडली, प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडमध्ये

    मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडली असून AQI 106 वर पोहोचला आहे. खराब स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडमध्ये आलं आहे.  एक्युआय बिघडल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या यंत्रणांवर बंदी घालण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

  • 19 Nov 2024 08:57 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात एकूण किती मतदान केंद्र?

    पुणे जिल्ह्यात एकूण 8462 मतदान केंद्र आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार आहेत, पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88 लाख 49 हजार 590 आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 79 हजार 216 तर महिला मतदारांची 42 लाख 79 हजार 569 आहे. पुणे जिल्ह्यात 805 तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात 6 लाख 63 हजार आहे. इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

  • 19 Nov 2024 08:46 AM (IST)

    तक्रारींवर उत्तर देण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी

    कॉंग्रेस, भाजपने निवडणूक आयोगाकडे 7 दिवसांची मुदत मागितली आहे. तक्रारींवर उत्तर देण्यासाठी एकमेकांवर आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक आचारसंहिता उल्लंघनावर तक्रारी दाखल केल्या. आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल 7 दिवसांची अधिक मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 19 Nov 2024 08:30 AM (IST)

    चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

    चंद्रपूरमधील मुल तालुक्यातल्या कोसंबी येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुल नगर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. काल संध्याकाळी प्रचार थंडावल्या नंतर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोसंबी गावात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रात्री जवळपास 12:30 वाजता सभा घेत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना संशय होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोसंबी गाव गाठले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी विजय चिमड्यालवार यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी करण्यात आली आहे. सकाळपर्यंत मूल पोलीस स्टेशन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या सुरु आहे.

  • 19 Nov 2024 08:15 AM (IST)

    पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप; अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट

    छत्रपती संभाजीनगर शहरात बोटाला शाई लावून पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत आरोप केला आहे. बोटाला शाही लावून मतदान कार्ड जमा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जवाहर नगर पोलिसांनी 18 लाख जमा केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप आहे. संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीत प्रकार घडल्याची माहिती आहे. रात्री उशीरा पर्यंत जवाहर नगर पोलीस ठाण्यात राडा सुरू होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान होणार आहे. काल अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर दगडफेक झाली. या हल्ल्यात अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर दगदफेक करण्यात आली आहे. गंगापूरचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. थंडीने पुणेकर गारठलेत. कारण पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Published On - Nov 19,2024 8:05 AM

Follow us
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....