Maharashtra Election News LIVE : दर्यापूरमधून महायुतीं उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याकडून उमेदवारी अर्ज
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : आज 24 ऑक्टोबर 2024. महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
महायुतीच्या जागवाटपाच्या मुद्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत. कालचा त्यांचा दौरा रद्द झाला होता, मात्र आज ते पुन्हा राजधानीत जाणार असून उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. राज्यात मविआ आणि महायुती च्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्ष , काँग्रेस, राष्ट्रवादी , शरद पवार पक्ष यांना प्रत्येकी ८५ जागांचे वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती तर उर्वरित 33 जागांसाठी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवडीची उमेदवारी अजय चौधरी की सुधीर साळवींना ? असा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर असून आज ते यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या राजकीय बातम्या, तसेच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
यूपी पोटनिवडणुकीत काँग्रेस सपाला पाठिंबा देणार
काँग्रेस यूपीची पोटनिवडणूक लढवणार नाही, सपाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देईल, असं काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केले आहे. यापूर्वी, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते की, जागा जिंकण्याचा विषय नाही, त्यामुळे इंडिया आघाडी सर्व जागांवर सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल.
-
आज 85 विमानांना पुन्हा निनावी धमक्या मिळाल्या
आज पुन्हा एकदा विमानांना बॉम्बचा धोका निर्माण झाला आहे. आज विविध विमान कंपन्यांच्या 85 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.
-
-
दर्यापूरमधून महायुतीं उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याकडून उमेदवारी अर्ज
दर्यापूरमधून महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाची जागा ही शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.
-
पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी
पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलं आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीची पुनरावृत्ती पाटणमध्ये होणार असल्याची प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली आहे.
-
समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभेतून घेतला उमेदवारी अर्ज
समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभेतून उमेदवारी अर्ज घेतला आहे. समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. समीर भुजबळ 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतर समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
-
-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष-चिन्हाबाबत पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष-चिन्हाबाबत पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यालयात पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणातील आजची सुनावणी संपली आहे.
-
शरद पवार यांना फोडाफोडीच नोबल दिलं पाहिजे-उदयनराजे भोसले
शरद पवार यांना फोडाफोडीच नोबल दिलं पाहिजे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला. शरद पवार यांच्या पक्षात सुरु असलेल्या इनकमिंगबाबतच्या प्रश्नावर उदयनराजे यांचं कराड मधील पत्रकार परिषदेत मिश्किल उत्तर दिलं.
-
रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी तासगाव तालुक्यातील तरुणांना बेकार ठेवल्याचा आरोप केला. त्यांनी यावेळी दमदार भाषण केले.
-
महायुतीची दिल्लीत लवकरच बैठक
महायुतीत काही जागांवरून वाद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत महायुतीची बैठक होत आहे. त्यानंतर भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
-
छगन भुजबळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
मंत्री छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाचव्यांदा नशीब आजमावतील.
-
वरळीत आदित्य ठाकरे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
वरळीत आदित्य ठाकरे हे थोड्याच वेळात त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणार. ओपन जीपमधून ते कार्यालयात आले. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
-
वर्सोवा विधानसभेत अल्ताफ पेवेकर यांनी घेतला नामनिर्देशन अर्ज
वर्सोवा विधानसभेत शिवसेनेचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी निवडणूक आयोगाकडून नॉमिनेशन फॉर्म घेतला. भारती लवेकर सध्या वर्सोवा विधानसभेत आमदार आहेत. वर्सोवा विधानसभेला लोकसभेत चांगला प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
-
भाजप आमदार प्रशांत बंब भरणार उमेदवारी अर्ज
प्रशांत बंब यांना चौथ्यांदा दिली आहे पक्षाने उमेदवारी. गंगापूर तहसील कार्यालयात प्रशांत बंब भरणार उमेदवारी अर्ज. मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत साधेपणाने भरणार उमेदवारी अर्ज
-
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील भरणार अर्ज
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
-
धनंजय मुंडे परळीतून दाखल करणार उमेदवारी अर्ज
धनंजय मुंडे हे परळीतून दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज.
-
येवल्यात छगन भुजबळ यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना येवल्यात छगन भुजबळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
-
आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून अर्ज भरणार
आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून अर्ज भरणार आहेत.
-
कन्नड विधानसभा मतदार संघ अजित पवार गटाला सुटल्याची माहिती
कन्नड विधानसभा मतदार संघ अजित पवार गटाला सुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडून संतोष कोल्हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. अजित पवारांनी फोन करून संतोष कोल्हे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. कन्नड मतदार संघावर शिंदे गट आणि भाजपनेही दावा सांगितला होता. मात्र अजित पवारांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेतल्याची माहिती आहे.
-
मविआला नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार सापडेना
नाशिक- मविआला नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार सापडेना. 8 दिवसांपासून उमेदवाराचा शोध सुरू आहे. नाशिक पूर्व मतदार संघातील अनेकांची शरद पवार आणि ठाकरे गटाकडून चाचपणी करण्यात आली. मात्र अद्यापही उमेदवाराचा घोळ सुटला नाही. राहुल ढिकले यांच्यासमोर सक्षम उमेदवार मिळत नसल्याने माविआची गोची झाल्याचं पहायला मिळतंय.
-
माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा- वैभव नाईक
“आज तुम्ही माझ्यासाठी भर उन्हात बसला आहात, मी तुमचे ऋण कधी विसरणार नाही. 50 खोके मंत्री बघून मी नाही गेलो. मला अनेक ऑफर होत्या. माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत झालेला भ्रष्टाचार मी बाहेर काढला,” असं वैभव नाईक म्हणाले.
-
अनेक लोक तिकीटसाठी दिल्लीला गेले, परंतु आमच्या पक्षात दिल्लीला जायची गरज नाही- सुप्रिया सुळे
“अनेक लोक तिकीटसाठी दिल्लीला गेले, परंतु आमच्या पक्षात दिल्लीला जायची गरज नाही. हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत, शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांचा विचारविनिमय करून निर्णय घेत होते. हर्षवर्धन पाटील यांना राज्यात प्रचार करायचा आहे. ही निवडणूक राज्याची महत्वाची आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुक्ताईनगरमध्ये एबी फॉर्म भरून उमेदवारी अर्ज दाखल
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये एबी फॉर्म भरून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी ते म्हणाले, “मला नाही वाटत की माझ्याशिवाय या मतदारसंघात सध्या एबी फॉर्म दाखल केला असेल. सरकार महायुतीचं बहुमताने येईल यात मात्र शंका नाही.” रोहिणी खडसे यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म आला नाही, त्यावरून चंद्रकांत पाटलांनी ही टीका केली आहे.
-
यशोमती ठाकूर उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर आज अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी यशोमती ठाकुर यांनी घेतले गुरूकुंज मोझरी मध्ये तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन. यशोमती ठाकूर पाचव्यांदा जाणार विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या. सलग तीन वेळा यशोमती ठाकुर तिवसा मतदारसंघातुन झाल्या विजयी.
-
धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देते – पंकजा मुंडे
“महायुतीची यादी जवळपास जाहीर झाली आहे. धनंजय मुंडे यांची सूचक म्हणून बहिण म्हणून मी उपस्थित आहे. सूचक म्हणून मी सही केलेली आहे. धनंजय मुंडे यांना मी शुभेच्छा देते. ही निवडणूक त्यांना सोपी जावी. चांगल्या मतांनी त्यांना विजय मिळावा. या मतदारसंघात परंपरागत आमच्या परिवाराने सेवा केली आहे, तशी त्यांनी सुद्धा सेवा करत रहावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
-
कल्याण पूर्वेत बंडखोरांची समजूत काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटात झालेल्या बंडखोरांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना काही प्रमाणात यश. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका माधुरी काळे रॅलीत सहभागी होणार. भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माधुरी काळे कार्यकर्त्यांसह दाखल.
-
अतुल भातखळकर यांची भव्य रॅली
आमदार अतुल भातखळकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढली. ढोल वाजवत अतुल भातखळकर यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले. यावेळी जनता एक लाखाहून अधिक मतांनी विजयी करेल, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
-
सुलभा गायकवाड आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थितीत
कल्याण पूर्वेमध्ये भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. सुलभा गायकवाड या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुलभा गायकवाड यांच्याकडून शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारिक वाद्य आणि ढोल ताशाच्या गजरात रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे. मंत्री विनोद तावडे, रवींद्र चव्हाण सह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळत आहे. या रॅलीत रामायणातील राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेत पात्रांचा सहभाग पाहायला मिळत आहे. या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण शहरात प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
-
अनिल पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांचं कुटुंबियांच्या वतीने औक्षण करण्यात आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. मंत्री अनिल पाटील यांची आई त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आलं. आईसह ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन मंत्री अनिल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. अमळनेर शहरात भव्य रॅली काढली जाणार आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शनही केले जाणार आहे.
-
काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही वाद नाही – संजय राऊत
काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही वाद नाही. महाविकासआघाडी २८८ जागा लढणार आहे. पण शेवटच्या क्षणी काही जागांवर अदलाबदल होऊ शकते – संजय राऊत
-
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज तुकोबांचं दर्शन घेऊन आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप नेते वेठीस धरत आहेत. ही चुकीची पद्धत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोडगा काढतील, असेही सुनील शेळकेंनी म्हटले.
-
धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल
परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाथरा या मूळ गावातून धनंजय मुंडे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. आई रुक्मिणी व स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधी भवनावर नतमस्तक झाले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे हे समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच धनंजय मुंडे परळीतील पंडिता अण्णा यांच्या समाधी स्थळाकडे रवाना झाले आहेत.
-
गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर धनंजय मुंडे नतमस्तक
धनंजय मुंडे यांचं गोपीनाथ गडावर आगमन झालं. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर धनंजय मुंडे नतमस्तक झाले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज अर्ज दाखल करणार आहेत. काहीच वेळात अर्ज दाखल करण्यासाठी परळीकडे रवाना होतील.
-
जळगावमध्ये दीड कोटींची रोकड सापडली
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाला नाकाबंदी दरम्यान पकडली दीड कोटींची रोकड सापडली आहे. एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटीची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती?,याचा खुलासा होऊ शकला नव्हता. परंतु या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
-
दक्षिण सोलापूरची जागा दिलीप मानेंना जागा सुटण्याची आशा
दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतरही काँग्रेसच्या दिलीप मानेंना जागा सुटण्याची आशा आहे. फेसबुक पोस्ट करत माजी आमदार दिलीप माने यांनी आशा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना जाहीर झाली आहे. काल उद्धव ठाकरेंनी अमर पाटील यांना बी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केलीय. माझा काँग्रेस पक्ष, त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर संपूर्ण विश्वास आहे. आपल्या काँग्रेसचा पारंपरिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढणार आहोत..!, अशी पोस्ट दिलीप माने यांनी शेअर केलीय.
-
मनोज जरांगेंच्या भेटासाठी इच्छुकांची गर्दी
आज मनोज जरांगे पाटलांचा उपस्थित राज्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक होत आहे. इच्छुकांशी मनोज जरांगे पाटील संवाद साधणार आहेत. अनेक इच्छुकातून एक उमेदवार निवडण्याची प्रक्रिया जरांगे पाटील आज पूर्ण करणार आहे. अंतरवाली सराटी येथे सकाळपासूनच इच्छुकांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
-
पिंपरी चिंचवड – पाण्याची टाकी कोसळून 3 ते 4 कामगारांचा मृत्यू
पिंपरी चिंचवड येथे भोसरी सद्गुरूनगर येथे पाण्याची टाकी कोसळून 3 ते 4 बिगारी कामगारांचा मृत्यू झाला आहे. अँब्युलन्स तसेच अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
-
आज महायुतीचे अनेक उमेदवार करणार उमेदवारी अर्ज दाखल
आज महायुतीचे अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिर्डी विधानसभेसाठी भाजपकडून महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर अकोलेतुन राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे हे आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले अर्ज दाखल करणार आहेत.
-
रत्नागिरी – शिवसेना शिंदे गटाचे राजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत आज दाखल करणार उमेदवार
रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्नीसह ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. किरण सामंत यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास.
-
माढ्यात आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे आज उमेदवारी दाखल करणार अर्ज
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी माढा येथे आमदार बबनराव शिंदेचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
राज्यात मविआ आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना
राज्यात मविआ आणि महायुती च्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्ष , काँग्रेस, राष्ट्रवादी , शरद पवार पक्ष यांना प्रत्येकी 85 जागांचे वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती तर उर्वरित 33जागांसाठी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी आहे.
तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढाही सुटला नसून 25-30 जागांच्या वाटपाबाबत भाजप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेण्यात येणार आहे. आज दुपारनंतर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार, जागा वाटपाबाबत आज राजधानीत होणार अंतिम शिक्कामोर्तब
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 9 च्या सुमारास दिल्लीला जाणार आहेत. राजधानीत ते अमित शाह यांची भेट घेणार असून
आज दिल्लीत जागा वाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीला जाणार होते मात्र त्यांंचा दौरा अचानक रद्द झाला होता. आज सकाळी ते पुन्हा दिल्लीला प्रस्थान करतील.
Published On - Oct 24,2024 8:22 AM