Maharashtra Breaking News LIVE : बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे जरांगे पाटलांच्या भेटीला, तासभरापासून चर्चा सुरु
Maharashtra Election News LIVE : आज 30 ऑक्टोबर 2024. दापोली विधानसभा मतदार संघात राजकीय आरोप-प्रत्यारोप. उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार संजय कदम यांना एबी फॉर्म मिळालाच नाही. एबी फॉर्म मिळाला नसल्याने इथला उमेदवार बदलला जाणार. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचा गंभीर आरोप. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra News: मनोज जरांगेंची तब्येत खालावली
मनोज जरांगेंची तब्येत खालावली… मनोज जरांगेंना ताप, आणि अशक्तपणा… खासगी रुग्णालयात उपचार सुरु… जरांगे यांनी आरामीची गरज असल्याची डॉक्टरांची माहिती…
-
Maharashtra News: उल्हासनगरमधील न्यू गजानन मार्केट परिसरात भीषण आग
उल्हासनगरच्या मंगलमूर्ती मार्केटसमोरील न्यू गजानन मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात आज सकाळी आग लागली. आग इतकी भीषण आहे की बाजूला असलेल्या फटाक्यांच्या बाजारापर्यंत पोहोचू शकते…. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. पण चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत…
-
-
Maharashtra News: मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत जरांगे उद्या करणार चर्चा…
अर्ज भरण्याची मुदत संपताच मनोज जरांगे सक्रिय… मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत जरांगे उद्या करणार चर्चा… मनोज जरांगे उद्या विविध समाजाच्या धर्मगुरुंशी संवाद साधणार… मराठा, अल्पसंख्याक, SC-ST मतांचं समीकरण जुळवण्यासाठी बैठक…
-
Maharashtra News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सोलापुरातील डॉक्टरांशी संवाद
डॉक्टरांच्या संवादादरम्यान प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका.. भारतात 2014 सालानंतर फार मोठा बदल झाला मात्र काँग्रेसच्या काळात गरिबी नष्ट करण्याचा नारा दिला पण तो पूर्ण झाला नाही… पंतप्रधान मोदींनी तळागाळातल्या कष्टकरी जनतेसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणून देशाला प्रगतीपथावर आणले… वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनीसुद्धा याचा भाग व्हावा असे आवाहन… भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ साधला डॉक्टरांशी संवाद…
-
Maharashtra News: माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, जरांगे पाटील यांच्या भेटीला
रणजीत शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा… रणजीत शिंदे यांनी माढा विधानसभेसाठी दाखल केला आहे अपक्ष उमेदवार अर्ज… माढा मतदारसंघात अजित पवार गटाकडून मीनल साठे तर शरद पवार गटाकडून अभिजित पाटील आहेत उमेदवार… माढा विधानसभा मतदारसंघात रंगणार तिरंगी लढत…
-
-
Maharashtra News: कुणी बंडखोरी करुन अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू – संजय राऊत
कुणी बंडखोरी करुन अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू… 90 टक्के जागांवर आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढली… कोकणात शिनसेना जास्त जागा लढतंय… सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा… जिथे पक्ष जिंकू शकतो तिथे जास्त जागा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
रणजीत शिंदेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट, तासभर चर्चा
अंतरवाली सराटी : माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी रणजीत शिंदे व जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. रणजीत शिंदे यांनी माढा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माढा मतदारसंघात अजित पवार गटाकडून मीनल साठे तर शरद पवार गटाकडून अभिजित पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे.
-
-
अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतरची पहिली दिवाळी, शरयू नदीच्या घाटावर उजळणार दिवे
अयोध्या : राम मंदिर झाल्यानंतर आज अयोध्येत पहिली दिवाळी साजरी केली जाणार आहे. शरयू नदी घाटावर आज भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीच्या घाटावर 28 लाख दिवे उजळणार आहेत. मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव पार पडणार आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
-
दिवाळीत झेडूंच्या फुलांनी बहरलं दादर, फुलांचा भावही वधारला
मुंबई : आज सकाळीच दिवाळीनिमित्त दादर फुलमार्केट झेंडूंच्या फुलांनी बहरलं आहे. झेंडू चांगलाच भाव खाऊन गेला आहे. झेंडूच्या एक माळेची विक्री ७० ते ८० रुपयाला होत आहे. दिवाळीत लक्ष्मीपुजनात झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे.
-
भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी भरला उमेदवारी अर्ज
सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री सचिन सावंत यांच्या उपस्थितीत अक्कलकोट भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अक्कलकोट मधील मुख्य भागातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी पारंपारिक लढत असणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
-
हा कसला ‘मावळ पॅटर्न’, हा तर…! सुनील शेळकेंचा भाजपाला इशारा
पुणे : अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना ही स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्न बाबतचं मौन सोडलेलं आहे. अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडेंना भाजप, शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दहशत मावळ पॅटर्न राबवलाय. पण हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे. हा चुकीचा पायंडा तुम्ही पाडत असाल तर भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा इशारा ही शेळकेंनी दिला.
-
नाशिकमध्ये 361 उमेदवारांनी केला अर्ज
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 361 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 506 लोकांनी उमेदवारी अर्ज नेला होता. 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. बंडखोरांना शांत करण्याचा सर्व पक्षातील नेत्यांसमोर आव्हान आहे. जिल्ह्यातील पाच ते सहा मतदारसंघात प्रमुख पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
-
यशवंत माने जरांगे पाटलांच्या भेटीला
मोहळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यशवंत माने मोहोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. मनोज जरांगे पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्यात चर्चा होत आहे. आमदार यशवंत माने यांना शरद पवार गटाचे राजू खरे यांचं आव्हान आहे.
-
श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क झाला
शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर 36 तासांपासून अज्ञातवासात गेले होते. आता वनगांचा कुटुंबीयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घरी येऊन वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले, अशी माहिती पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये ते घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज आहे. वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. वर्षा बंगल्यावर जाण्याची त्यांची इच्छा नसल्याचं ही पत्नीने स्पष्ट केलं आहे.
-
अयोध्या 28 लाख दिव्यांनी उजळून निघणार
राम मंदिर झाल्यानंतर आज अयोध्येत पहिली दिवाळी साजरी होत आहे. शरयू नदी घाटावर आज भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. 28 लाख दिवे शरयू नदी घाटावर उजळणार आहे. मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत दीपोत्सव पार पडणार आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्येत दाखल झालेत.
-
हिंगोलीत भाजपमध्ये बंडखोरी
हिंगोली विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपाचे रामदास पाटील सुमठानकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास पाटील सुमठानकर अपक्ष म्हणून हिंगोली विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीत भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. आज या अर्जांची छाननी केली जाणार आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या रॅली आणि सभा होत आहेत. उमेदवारी नाकारल्याने श्रीनिवास वनगा हे नॉटरिचेबल होते. आता अखेर 36 तासांनंतर त्यांच्याशी संपर्क झाला आहे. पकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा हे विश्रांती घेत आहेत, असं त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितलं आहे. या शिवाय दिवाळीचा सण आहे. अवघा भारत देश दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाला आहे. याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Published On - Oct 30,2024 8:25 AM