Maharashtra Breaking News LIVE : कल्याण ग्रामीण मतदारसंघात राज ठाकरे यांची थोड्या वेळात जाहीर सभा
Maharashtra Election News LIVE : आज 4 नोव्हेंबर 2024. दापोली विधानसभा मतदार संघात राजकीय आरोप-प्रत्यारोप. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडी यशस्वी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत. थोड्याच वेळात जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. कोण- कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
उद्धव ठाकरेंच्या उद्यापासून प्रचारसभांच्या धडाक्याला सुरुवात होणार
उद्धव ठाकरेंच्या उद्यापासून प्रचारसभांच्या धडाक्याला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचा दर्शन घेऊन प्रचार सभांना सुरुवात करणार आहेत.
उद्धव ठाकरेंचा उद्याचा दौरा असा असेल :
दुपारी १२ वाजता – कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाई देवीचा दर्शन घेतील
दुपारी साडे १२ वाजता -दर्शन झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता राधानगरी विधानसभा आदमापुर येथे सभा
कोल्हापूर नंतर रत्नागिरीकडे सभेसाठी जाणार
५ वाजता – रत्नागिरी शहरात पोहोचतील
६ वाजता – साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या मैदानावर उद्धव ठाकरे रत्नागिरी मध्ये सभा घेणार आहेत
-
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी माझा उमेदवारी अर्ज ठेवण्यास सांगितले आहे – रामदास झोळ
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मनोज जरांगे यांचे समर्थक प्रा.रामदास झोळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माझा उमेदवारी अर्ज ठेवण्यामध्ये गनिमी कावा आहे. सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये सांगायच्या नसतात. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी माझा उमेदवारी अर्ज ठेवण्यास सांगितले आहे
-
-
संजय केळकर म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा माणूस – आशिष शेलार
संजय केळकर यांचा विजय ठाणेकर करतील म्हणून ठाणेकरांचे आभार सुरवातीलाच मानतो. संजय केळकर म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा माणूस, संवेदनशील विकासाचा विकास पुरुष असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
-
‘फडणवीसांनी शेळकेंचा प्रचार केला तरी ‘मावळ पॅटर्न’ राबवणारचं’
फडणवीसांनी शेळकेंचा प्रचार केला तरी ‘मावळ पॅटर्न’ राबवणारचं, स्थानिक भाजप नेत्यांनी अशी आक्रमक भूमिका मांडली आहे.
-
कल्याण ग्रामीण मतदारसंघात राज ठाकरे यांची थोड्या वेळात जाहीर सभा
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील, कल्याण पश्चिम उल्हास भोईर, उल्हासनगर मधील भगवान भालेराव,मुरबाड उमेदवार संगीता चेंदवणकर त्यांच्या प्रचाराची सुरुवात करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जोश भरण्यासाठी राज ठाकरे याची सभा होणार आहे.
तर डोंबिवलीच्या सभेनंतर ठाण्यातही राज ठाकरे यांची होणार सभा होणार आहे.सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ राज ठाकरे डोंबिवलीतून फोडणार असून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत आहे.
-
-
करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी संजय शिंदे नावाचे तीन उमेदवार
करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी संजय शिंदे नावाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह संजय शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. करमाळा विधानसभा निवडणुक ही चुरशीची होत असते. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे गेल्या निवडणुकीत 5 हजार 494 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी गॅजेट करून संजयमामा शिंदे असा नावात बदल करून घेतला आहे. संजय वामन शिंदे (बहुजन समाज पार्टी) आणि संजय लिंबराज शिंदे अपक्ष असे नावात साधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
शिंदे शिवसेनेच्या मनोज मोरे यांची माघार
धुळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी माघार घेतली आहे. भाजपा उमेदवार अनुप अग्रवाल शिवसेना पक्ष कार्यालयात मनोज मोरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मनोज मोरे यांनी माघार घेतल्यामुळे आभार मानण्यासाठी अनुप अग्रवाल भेटीला गेल्याचं म्हटलं जात आहे.
-
नालासोपारा विधानसभेत 12 उमेदवार रिंगणात, तर 4 उमेदवारांची माघार
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातलं चित्र स्पष्ट झालं आहे.नालासोपारा विधानसभेत 12 उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपाचे राजन नाईक, बहुजन विकास आघाडी कडून क्षितिज ठाकूर, मनसेचे विनोद मोरे, बीएसपीकडून सुरेश मोने, काँग्रेसचे संदीप पांडे, प्रहारचे धनंजय गावडे, RSPचे नरसिंग अदावले, वंचित बहुजन आघाडी सूचीत गायकवाड, यांच्यासह 4 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत तर काँग्रेस कडून भगीरथ भालके दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हं आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याने भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना किती फायदा होतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
-
सदा सरवणकरांना एकनाथ शिंदेंचा फोन, ‘वर्षा’वर बैठकीसाठी दाखल
माहीम विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर सध्या तातडीची बैठक बोलवण्यात आला आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदेंनी फोन केला होता. त्यामुळे आता सदा सरवणकर हे माघार घेणार की लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल
विक्रोळी विधानसभा क्षेत्रामध्ये ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी लढत असताना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाचा निषेध महायुतीकडून करण्यात आलेला आहे. याबद्दल विक्रोळी पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सुनील राऊत यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. सुनील राऊत यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे अशाप्रकारे महिलांबाबत वक्तव्य करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. राऊत यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे.
-
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये सिल्व्हर ओकवर बैठक, प्रचारसभांबाबत चर्चा होणार
महाविकासआघाडीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचे नेते उपस्थितीत राहणार आहे. या बैठकीत प्रचारसभेंचे नियोजन कसं करायचं यावर चर्चा होणार आहे.
-
रश्मी शुक्लांची निवडणुकीशी संबंधित पदावर नियुक्ती करु नका, काँग्रेसची मागणी
राज्य सरकारने त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली होती. रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या. त्या आमच्या फोन टॅप करत होत्या. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. पण रश्मी शुक्ला यांची निवडणुकीशी संबंधित कोणत्याही पदावर नियुक्ती केली जाऊ नये, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
-
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे.
-
काहीतरी मिळेल या अपेक्षेने माघार घेणार नाही- सदा सरवणकर
“काहीतरी मिळेल या अपेक्षेने माघार घेणार नाही. मुख्यमंत्री स्वत:हून माघार घ्या असं मला बोलले नाहीत. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुतीला फटका बसणार. मी अर्ज मागे घेणार नाही,” असं सदा सरवणकर म्हणाले.
-
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. दिवाळी सणामुळे आम्हाला कोर्टाकडे न्यायप्रविष्ट चिन्हाबाबतची माहिती सादर करता आली नाही, त्यामुळे सुनावणी पुढील आठवड्यात घ्या अशी विनंती अजित पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र कोर्टाने स्पष्ट केलं की बुधवारपर्यंत तुम्हाला जे सादर करायचे ते करा. त्यामुळे बुधवारी याबाबतीत सुनावणी होणार आहे.
-
मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढली
जळगावच्या रिधुर गावात प्रचारादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढली. मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदार संघातील गावागावात प्रचार सुरू आहे. प्रचारादरम्यान रिधूर गावात मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली.
-
कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार- सदा सरवणकर
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची भावना आहे. मतदारसंघातील जनतेची भूमिका लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार,” असं सदा सरवणकर म्हणाले.
-
उमेदवारांच्या अर्ज माघारीबाबत राऊतांची प्रतिक्रिया
“आपापले उमेदवार जे आहेत, ज्यांनी अर्ज भरले आहेत मी त्याला बंडखोरी म्हणत नाही. काही ठिकाणी अर्ज भरले त्या तिन्ही पक्षाच्या वतीने आम्ही एकमेकांना त्यांच्या याद्या दिल्या. काल दिवसभर सर्व नेते आम्ही एकमेकांशी बोलत होतो. दिवसभरात चित्र स्पष्ट होईल. नाशिकमधून सीपीआयएमच्या नेत्यांना आम्ही उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. प्रत्येकजण आपापल्या नेत्याला, उमेदवाराला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, ते यशस्वीदेखील होतील,” असं राऊत म्हणाले.
-
उत्तराखंडच्या अल्मोडा इथ बसचा भीषण अपघात
उत्तराखंडच्या अल्मोडा इथ बसचा भीषण अपघात झाला असून 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील सल्टजवळ ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. चालकाच बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
जरांगेंच्या लढ्याला आमचा कायम पाठिंबा- संजय राऊत
“मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा समाजाच्या उद्धारासाठी आहे. त्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावलेली आहे. निवडणुकीच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. हा राजकीय लढा नाही, सामाजिक लढा आहे. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
-
जरांगे यांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय अत्यंत योग्य- भुजबळ
“मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करतो. देर आये दुरुस्त आये. एका समाजावर निवडणूक लढविणे शक्य नाही. इतर समाज साथ देत नाही. मराठा समाज मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेतील. सर्व पक्षातून देण्यात आलेले उमेदवार 60 ते 70 टक्के मराठा समाजाचे आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
-
देर आए, दुरूस्त आए – मनोज जरांगेच्या निर्णयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
देर आए, दुरूस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया जरांगेच्या निर्णयावर छगन भुजबळांनी दिली. विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनोज जरांगेंनी आज सकाळी जाहीर केला.
-
आज दुपारी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सिल्व्हर ओकवर जाणार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक
आज दुपारी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सिल्व्हर ओकवर जाणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत प्रामुख्याने आगामी प्रचार सभा याबाबत चर्चा होईल. महाविकास आघाडीतील जागांच निश्चित वाटप देखील बैठकी नंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
-
भाजप, शिंदे गट बोगस यंत्रणा निर्माण करत आहेत का ? – संजय राऊत यांचा सवाल
भाजप, शिंदे गट बोगस यंत्रणा निर्माण करत आहेत का ? लोकांना त्रास देत बोगस भरारी पथकानं कमाई केली . तपास पथकाकडून गाड्या अडवून तपासणी केली जात आहे. महिलांच्या पर्सही तपासल्या जात आहे, संजय राऊतांचे टीकास्त्र
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात, नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात झाली असून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार समोर शिंदेचे सहा उमेदवार उभे आहेत. पक्षातील बंडखोर उमेदवार यांची मनधरणी करण्याकरिता ही बैठक असून यामध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, गोपाळ शेट्टींची बोरिवलीमधून माघार
भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळाल आहे. गोपाळ शेट्टींनी बोरिवलीमधून माघार घेतली आहे. विनोद तावडे यांना गोपाल शेट्टींची समजूत काढण्यात यश आहे. बोरिवलीमधून भाजपच्या संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
Maharashtra News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची समरजित घाटगे आणि माधुरी छत्रपती यांनी घेतली भेट… कागल मधून समरजित घाटगे यांना महायुगासागाडीकडून उमेदवारी तर कोल्हापूर उत्तर मधून मधुरिमा राजे छत्रपती आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार… दोन्ही उमेदवारांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट…
-
Maharashtra News: निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपूवू – जरांगे पाटील
दबाव आला नाही, मी बदलत नाही, आम्हाला निवडून यायचं होत… पण निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपूवू… निवडणुकीचा जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा सांगितलं एका जातीवर निवडून नाही लढता येत… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: आपल्याला आता निवडणूक लढायची नाही – जरांगे पाटील
आपल्याला आता निवडणूक लढायची नाही… सर्वांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे… ह्याला पाड आणि त्याला पाड ही आपली भूमिका नाही… कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू
12 नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी एकादशीचा सोहळा… कार्तिक यात्रेला येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शनी मिळावे यासाठी 24 तास दर्शन सुरू करण्याचा मंदिर समितीने घेतला निर्णय… आज पासून देवाचे नित्योपचार वगळता राजोपचार केले जाणार बंद… विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला दररोज दुपारी लिंबू पाण्याचा देखील दिला जातो नैवेद्य…
-
Maharashtra News:विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेची माघार
मित्रपक्षांची अजून यादी आली नाही… काल समाजाच्या बांधवांशी मतदारसंघावर चर्चा झाली… एकाच जातीवर कसं लढणार… एकाच जातीवर लढणं शक्य नाही… विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेची माघार
-
Maharashtra News: काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर
शहादा तळोदा मतदार संघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी… काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांची करणार मन धरणी… शहादा तळोदा मतदार संघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सुहास नाईक यांनी केली होती अपक्ष उमेदवारी…. नंदुरबार मधील विधान हॉटेलला होणार भेटी गाठी…. सकाळी अकरा वाजता होणार बैठाका…
-
भीमा कोरेगाव प्रकरणी आजपासून सुनावणी
भीमा कोरेगाव आयोगाची आजपासून पुढील तीन दिवस सुनावणी होणार आहे. आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. सगळ्या वकिलांना आजपासून तीन दिवस हजर राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. याआधी अनेकांच्या आयोगासमोर चौकशी पार पडल्या आहेत. आजपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होत आहे.
-
हिंगोलीतील भाजपचे बंडखोर नेते नॉट रिचेबल
हिंगोलीतील भाजपचे बंडखोर नेते रामदास पाटिल सुमटानकर नॉट रिचेबल आहेत. भाजपमधून बंडखोरी करत हिंगोली विधासभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्ष्याचा राजीनामा देणारे रामदास पाटिल सुमटानकर नॉटरिचेबल आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रामदास पाटिल सुमटानकर नॉट रिचेबल आहेत. हिंगोली विधानसभेत महायुतीकडून भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
पंढरपुरात भाविकांचा मेळा…
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू झालं आहे. 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे. कार्तिक यात्रेला येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शनी मिळावे यासाठी 24 तास दर्शन सुरू करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे. आजपासून देवाचे नित्योपचार वगळता राजोपचार बंद केले जाणार आहेत. 24 तास दर्शन देऊन विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पाठीशी उशी ठेवली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला दररोज दुपारी लिंबू पाण्याचा देखील नैवेद्य दिला जातो.
-
नंदुरबारमधील लक्ष्मीनगर परिसरात भीषण आग
नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर परिसरात भीषण आग लागली आहे. रेल्वे फाटक जवळ असलेल्या एका ऑक्सिजन सिलेंडरच्या दुकानात आग लागली. परिसरातील तीन ते चार दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती आहे. ऑक्सीजन सिलेंडरांचा स्फोट मुळे शहरातून जाणाऱ्या उडाण पूल वरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. फटाक्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या परिसरात लागलेल्या आगीमुळे शहरभरात एकच खळबळ उडाली आहे.
Published On - Nov 04,2024 8:02 AM