Maharashtra Breaking News LIVE : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा, मराठी माणसाचे द्वेष्टे आहेत – संजय राऊत भडकले

| Updated on: Nov 06, 2024 | 10:13 AM

Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 6 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा,  मराठी माणसाचे द्वेष्टे आहेत  - संजय राऊत भडकले
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Nov 2024 10:12 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा, मराठी माणसाचे द्वेष्टे आहेत – संजय राऊत भडकले

    देवेंद्र फडणवीस हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा, अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा द्वेष्टा आहे , हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं, संजय राऊतांची घणाघाती टीका.

    आम्ही शिवरायाचं मंदिर बांधतोय याची लाज वाटते का ? अशी माणसं महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजप त्यांना पोसतोय .

  • 06 Nov 2024 10:10 AM (IST)

    महाराष्ट्राच्या स्वाभिमान शिंदेंनी दिल्लीत गहाण ठेवला – संजय राऊत

    महाराष्ट्राच्या स्वाभिमान शिंदेंनी दिल्लीत गहाण ठेवला. ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजपच्या पोटात दुखलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • 06 Nov 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: आमदार संतोष बांगरांच्या कळमनुरीत विधानसभेत उद्धव ठाकरेंची सभा

    नऊ तारखेला उद्धव ठाकरे यांची कळमनुरी विधानसभेत सभा… महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा… कळमनुरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष टारफे यांची माहिती

  • 06 Nov 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार – एकनाथ शिंदे

    लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार… 25 हजार महिलांना पोलीस दलात भरती करणार… निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महत्त्वाची आश्वासनं

  • 06 Nov 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: पुण्यातील कांग्रेस बंडखोर नेत्यांवर कारवाई होणार

    शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पाठवला कारवाईचा अहवाल… पक्षाने सूचना देवून पण पक्ष विरोधी काम केलं… पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात यावी… पुणे शहर काँग्रेसने नाना पटोले यांना प्रस्ताव पाठवला… कसब्यात कमल व्यवहारे , पर्वतीत आबा बागुल , शिवाजीनगरला मनीष आनंद यांची बंडखोरी… महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी व्हा म्हणून दिल्या सूचना… दोन दिवसात पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार…

  • 06 Nov 2024 08:57 AM (IST)

    बीकेसीत इंडिया आघाडीची जाहीर सभा

    मुंबईतील बीकेसीत इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. बीकेसीतील या सभेत राहुल गांधींची तोफ धडाडणार आहे.  त्यांच्या स्वाभिमान सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सभेला मविआचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे , वर्षा गायकवाड सहीत इतर मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहेत. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसच्या 5 गॅरंटी आज राहुल गांधी विधान सभा निवडणुकांपुर्वीजाहीर करणार आहेत.

  • 06 Nov 2024 08:45 AM (IST)

    पुण्यातील सराफाविरोधात गुन्हा दाखल

    हत्तीच्या केसाचे दागिने विकणाऱ्या सराफाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. हत्तीच्या केसापासून अंगटी आणि ब्रेसलेट तयार केल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दागिने पडताळणीसाठी पाठवले. कुमठेकर रस्त्यावरील व्ही. आर. घोडके सराफाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 06 Nov 2024 08:30 AM (IST)

    दहावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

    दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. आता ६ ते १९ नोव्हेंबर पर्यत भरता अर्ज येणार आहे. २० ते ३० नोव्हेंबर विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

  • 06 Nov 2024 08:15 AM (IST)

    अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. जाहीरनाम्यात राष्ट्रवादीकडून कोणती आश्वासन दिली जाणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. आज बारामतीत अजित पवार तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सभांचा धडाका सुरु आहे. इंडिया आघाडीची आज मुंबईत पहिली सभा होत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे. या सभेला राहुल गांधी, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. आज अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. पुण्यातील काँग्रेस बंडखोर नेत्यांवर कारवाई होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Published On - Nov 06,2024 8:03 AM

Follow us
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.