Maharashtra Assembly Election 2024 LIVE : जागा वाटपासाठी दिल्लीत महायुतीची बैठक, अमित शाहांनी दिली महत्वाची सूचना

| Updated on: Oct 19, 2024 | 10:48 AM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घडामोडींबाबतचे सर्व अपडेट्स वाचा.....

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : जागा वाटपासाठी दिल्लीत महायुतीची बैठक, अमित शाहांनी दिली महत्वाची सूचना

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Oct 2024 10:48 AM (IST)

    महायुतीत मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटला – सूत्र

    महायुतीत मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 18, शिंदे गट 16 तर अजित पवार 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.

  • 19 Oct 2024 10:32 AM (IST)

    माजी मंत्री गुलाबराव देवकर शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत

    जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर शरद पवारांच्या भेटीसाठी रात्री तातडीने विमानाने मुंबईत. जळगाव ग्रामीण मतदार संघात जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

    जळगाव ग्रामीण मतदार संघात जागा ही मशाल चिन्हावरच लढवली जावी यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत.

  • 19 Oct 2024 10:23 AM (IST)

    ठाकरे गट-पवार गटात जागावाटपाबाबत वाद नाही – संजय राऊत

    ठाकरे गट-पवार गटात जागावाटपाबाबत कोणताही वाद नाही. काल दिवसभर आमची पवार गटाशी चर्चा झाली. आज रमेश चेन्निथला उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत असं संजय राऊन यांनी सांगितलं.

  • 19 Oct 2024 10:13 AM (IST)

    समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची धुळ्यात सभा

    समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज 11 वाजता धुळ्यात जेल रोड येथे सभा होणार आहे.

    सभेसाठी मोठा शामियाना घालण्यात आला असून हजारो खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार.

    इंडिया अलायन्स मधील घटक पक्ष असलेल्या समाजवादीचा धुळे शहर विधानसभेवर दावा असून अखिलेश यादव नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

  • 19 Oct 2024 09:57 AM (IST)

    आळंदीत तिसरा पर्याय दिला जाणार

    पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून चुकीचे उमेदवार दिल्यास तिसरा पर्याय देण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख नेत्यांचा एकत्र येत बैठकीत निर्णय घेण्यात आली.महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवारी जाहीर होणे अगोदरच सर्व पक्षीय नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या हितासाठी गुन्हेगारी आणि वादविवाद थांबवण्यासाठी, तालुका चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचा तिसरा पर्याय देण्याचा विचार करण्यात आला आहे.

  • 19 Oct 2024 09:45 AM (IST)

    ९५ टक्के महिला मतदारांचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

    नाशिक जिल्ह्यात १५ लाख बहिणी लाडक्या… ९५ टक्के महिला मतदारांचे योजनेसाठी अर्ज केला आहे. ७९ हजार महिला ठरल्या योजनेसाठी अपात्र ठरल्यात ७ लाख ३८ हजार ५५६ महिलांनी अर्ज अॅपद्वारे केला आहे.  तर ८ लाख ३५ हजार ८५३ अर्ज पोर्टलद्वारे जिल्ह्यात प्राप्त झालेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ७४ हजार ४०९ बहिणींचे अर्ज आले आहेत.

  • 19 Oct 2024 09:30 AM (IST)

    शिरूरमध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला

    पुण्याच्या शिरूर तालुक्यात चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला केला आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वंश राजकुमार सिंग मृत मुलाचे नाव आहे. रात्री उशिरा घरासमोरील ओट्यावरून या चिमुकल्याला बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेले यातच या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे.

  • 19 Oct 2024 09:15 AM (IST)

    नाशिकमध्ये मोर्चा-आंदोलनावर बंदी

    नाशिकमध्ये २५ नोव्हेंबर २०२४ मोर्चा – आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंदोलन, मोर्चा, निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी तसे आदेश दिलेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी असमार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी मोर्चे आंदोलनावर निर्बंध आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आता घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत काल रात्री भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. महाविकास आघाडीचंही जागावाटप जवळपास झालं आहे. 48 जागांवर मात्र महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळतेय. विदर्भाच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमच्या ब्लॉगला फॉलो करा.

Published On - Oct 19,2024 9:09 AM

Follow us
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.