245 जागांवर उमेदवार ठरले, उर्वरित 43 जागांचा निर्णय कधी? विधानसभेसाठी महायुतीचा तगडा प्लॅन काय?

आज दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. पत्रकार परिषदेनंतर तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत अमित शाहांशी चर्चा करणार आहेत.

245 जागांवर उमेदवार ठरले, उर्वरित 43 जागांचा निर्णय कधी? विधानसभेसाठी महायुतीचा तगडा प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 12:18 PM

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल घोषित केला जाईल. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे. आज मुंबईत महायुतीच महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या निवडणुकांच्या जागावाटपाबद्दल अंतिम बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 110 जागा लढण्यावर ठाम आहे. तर भाजप 150 जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्या पाठोपाठ अजित पवार गट 75 जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. यानुसार महायुतीतील घटक पक्षांमध्ये 245 जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

245 जागांवर महायुतीचे उमेदवार ठरले

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 245 जागांवर महायुतीचे उमेदवार ठरले आहे. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र उर्वरित 43 जागांवरील तिढा दिल्लीत सुटणार आहे. यानुसार शिंदे गट 110, भाजप 150 आणि अजित पवार गट 75 जागा लढवतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक पक्षाला अंतिम तोडगा काढताना 10 ते 15 जागा सोडाव्या लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर आज दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. पत्रकार परिषदेनंतर तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत अमित शाहांशी चर्चा करणार आहेत. यावेळी ते जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय घेतील, असे म्हटले जात आहे.

विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु

22 ऑक्टोबरला अधिसूचना निघेल 23 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येईल 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.