तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो? पेन्शन आणि भत्त्याची रक्कम पाहून…

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक माजी आमदाराला पेन्शन मिळते. जर एखादा व्यक्ती एकदा आमदार झाला तरीही त्याला निवृत्ती वेतन सुरू होते.

तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो? पेन्शन आणि भत्त्याची रक्कम पाहून...
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 3:44 PM

MLA salary details : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यानंतर राज्याला लवकरच नवनियुक्त आमदार मिळणार आहेत. आमदार हे आपपल्या विधानसभा मतदारसंघाची सतत काम करत असतात. त्यासाठी त्यांना एक विशिष्ट निधी दिला जातो. पण आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की आमदाराचा पगार किती असेल, त्याला किती पेन्शन किंवा भत्ता मिळत असेल. त्यासोबतच त्याला काय सोयी-सुविधा मिळत असतील? चला तर आपण जाणून घेऊया…

आमदाराचा पगार किती?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांना नियमानुसार विशिष्ट रक्कम पगार म्हणून दिली जाते. त्यासोबतच काही भत्ते आणि सुविधाही दिल्या जातात. प्रत्येक आमदाराला नियमानुसार पगार, भत्ता, सवलती या मिळतात. बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने विधिमंडळातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार 200 रुपये पगार मिळतो.

कोणकोणते भत्ते मिळतात?

त्यासोबतच त्यांना इतर काही भत्ते आणि सुविधाही दिल्या जातात. आमदारांना टेलिफोनसाठी 8 हजार रुपये भत्ता, स्टेशनरीसाठी 10 हजार रुपये भत्ता, तसेच संगणकासाठी 10 हजार रुपये भत्ता दिला जातो. यांसह अनेक भत्ते पकडून प्रत्येकी एका आमदाराला महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये पगार मिळतो. याशिवाय अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला दर दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्ता स्वरुपात दिली जात आणि ती रक्कम दरदिवशी 2 हजार रुपये अशी असते. तसेच आमदारांच्या पीएच्या पगारासाठी 25 हजार रुपये मंजूर करण्यात येतात.

त्यासोबतच आमदाराला राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15 हजार रुपये मिळतात. तर महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात. तर आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात. यांसह BEST, MSRTC आणि MTDC मध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.

माजी आमदाराला पेन्शन किती?

राज्यात प्रत्येक माजी आमदाराला निवृत्ती वेतन मिळते. आमदाराचे निधन झाले असल्यास त्यांच्या कुटुंबालाही निवृत्ती वेतन मिळते. दोन्ही पैकी कोणत्याही एका सभागृहात शपथ घेतलेल्या माजी आमदाराला निवृत्ती वेतन मंजूर होते. माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. जर एखादा आमदार एकाहून अधिक टर्म आमदार झाला असेल तर त्याच्या निवृत्ती वेतनात 50000+2000 असे प्रत्येक टर्मसाठी वाढत जातात. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक माजी आमदाराला पेन्शन मिळते. जर एखादा व्यक्ती एकदा आमदार झाला तरीही त्याला निवृत्ती वेतन सुरू होते.

यापूर्वी आमदारांचं निवृत्ती वेतन 40 हजार रुपये होतं. 2016 मध्ये या निवृत्तीवेतनात 10 हजारांनी वाढ करण्यात आली. आमदाराच्या निधनानंतर- पती किंवा पत्नीला 40 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. तसंच रेल्वे प्रवासाचीही सुविधा मिळते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.