“मी आमदार झालो तर सर्व पोरांचे लग्न करुन देणार”, परळीतील उमेदवाराचे अजब आश्वासन

"जर मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न करुन देऊ", असे आश्वासन शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मी आमदार झालो तर सर्व पोरांचे लग्न करुन देणार, परळीतील उमेदवाराचे अजब आश्वासन
राजेसाहेब देशमुख
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 4:40 PM

Maharashtra Assembly Election 2024 : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील एका उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “जर मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न करुन देऊ”, असे आश्वासन शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातील हायव्होलटेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून परळी विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत आहे. नुकतंच राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी केलेल्या अजब आश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे.

राजसाहेब देशमुख नेमकं काय म्हणाले?

“परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का? सरकारच देत नाही तर कशी लागणार, काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळे सर्व पोरांचं लग्न होणं अवघड झालं आहे. त्यामुळे सर्व पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ”, असे आश्वासन राजसाहेब देशमुख यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

“बाबूराव तुमचं लग्न करायचंय…त्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही”,  असेही राजेसाहेब देशमुख म्हणाले. त्यांच्या या अजब आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत

दरम्यान बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. परळीत अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार धनंजय मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.