ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राणांना मोठा धक्का, 17 वर्षांपासून सोबत असलेल्या विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे.

ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राणांना मोठा धक्का, 17 वर्षांपासून सोबत असलेल्या विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ
रवी राणा
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 2:37 PM

Jitu Dudhane Resigns : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. ते रवी राणा यांचे अंत्यत विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.

गेल्या 17 वर्षांपासून काम

आमदार रवी राणा हे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या 17 वर्षांपासून जितू दधाने हे आमदार रवी राणा यांच्यासोबत काम करत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दुधाने यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“युवा स्वाभिमान संघटनेत माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मला जबाबदारीतून मुक्त करां”, असे जितू दुधाने यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांच्या राजीनामा पाठवला आहे. जितू दुधाने यांनी राजीनामा देण्यामागील नेमकं कारण काय याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राजकीय वर्तुळात खळबळ

जितू दुधाने हे गेल्या १७ वर्षांपासून युवा स्वाभिमान संघटनेसोबत काम करत आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. रवी राणा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. रवी राणा यांचे निकटवर्तीय म्हणून ते कायमच सक्रीय असायचे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जितू दुधाने यांनी राजीनामा दिल्याने रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.