“तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज, पाठीवर हात ठेवून फक्त…”; शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मागच्या वेळी दिल्लीत असताना त्यांनी माझ्याकडे देखील हा विषय बोलून दाखवला होता. आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हा विचारही मनात आणू नका, असेही संजय राऊत म्हणाले

तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज, पाठीवर हात ठेवून फक्त...; शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊत आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 12:31 PM

Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “ अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्या. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे”, असे विधान शरद पवारांनी केले. शरद पवार या विधानानंतर आता ते राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “तुम्ही ठाम उभे रहा आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत. तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे”, अशी भावूक साद संजय राऊतांनी शरद पवारांना दिली.

“शरद पवारांइतका अनुभवी नेता देशाच्या राजकारणात नाही”

“शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरु आहेत. ते राजकारणातील भीष्म पितामह आहेत. गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशाच्या संसदीय राजकारणात विधानसभा, लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभा अशा सर्व सभागृहात त्यांनी काम केले आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या इतक्या संसदीय राजकारणाचा अनुभव असणारा नेता देशाच्या राजकारणात नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“तुम्ही हा विचारही मनात आणू नका”

“गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात हे विचार येत आहेत. मागच्या वेळी दिल्लीत असताना त्यांनी माझ्याकडे देखील हा विषय बोलून दाखवला होता. आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हा विचारही मनात आणू नका. वय हा विषय नसून अनुभव हा विषय आहे. तुम्ही संसदीय राजकारणात असणं हे आमच्यासाठी मार्गदर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे आहे. काल त्यांनी जाहीरपणे हा विषय बोलून दाखवला”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

“आम्ही लढायला तयार आहोत”

“शरद पवारांचा राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला देशाला राजकारणाला आणि तरुणांना व्हायला पाहिजे. पण गेल्या काही काळापासून दिल्लीच्या राजकारण्यांनी जे राजकारण केलं आहे, त्यामुळे ते व्यथित आहेत असं दिसत आहे. पण तरीही ते या वादळाला तोंड देत ते आज उभे आहेत. मी इतकाच सांगेन आपण जिथे आहात तिथे ठाम उभे रहा आणि आमच्या सारखी माणसं आहेत त्यांना पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत. हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे. देश वाचवायचा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.