महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासंग्राम, मतदानाचे अपडेट कुठे पाहाल? फक्त एक क्लिक आणि…
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आहे. या महासंग्रामासाठी आज थोड्यात वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे. त्यावेळी राज्यात आवाज कुणाचा असेल हे स्पष्ट होणार आहे. त्यासाठी राज्यातील मतदार मतदान करणार आहेत. मतदानाची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही अपडेट घेण्यासाठी तुम्ही टीव्ही9 मराठीच्या चॅनल आणि टीव्ही9 मराठीच्या संकेतस्थळावर जाऊन क्लिक करू शकता.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात होणार आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदार संघ आहेत. या 36 मतदारसंघात 10229708 इतके मतदार आहेत. मुंबईत 10 हजार 117 मतदान केंद्र आहेत. त्यात महिला संचालित 38 मतदान केंद्र आहेत. दिव्यांग संचालित मतदान केंद्र 8 आहेत.
10 हजार पोलिसांचा फौजफाटा
ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 10 हजार 935 पोलीस 4 हजार 161 होमगार्ड व केंद्रीय सुरक्षा बलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 244 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 72 लाख 29 हजार 339 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे 20 गुन्हे दाखल झाले असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसी कॅमेराचा विशेष वॉच ठेवण्यात येणार आहे.
सहा मतदारसंघात दोन बॅलेट युनिट
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 138 कल्याण पश्चिम, 140 अंबरनाथ (अ.जा), 141 उल्हासनगर, 142 कल्याण पश्चिम, 145 मीरा भाईंदर, 150 ऐरोली विधानसभा या 6 मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट असणार आहेत.
6955 मतदान केंद्रे सज्ज
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6894 ही मूळ मतदान केंद्रे व 61 सहायकारी मतदान केंद्रे अशी एकूण 6955 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण 8273 बॅलेट युनिट, 8273 कंट्रोल युनिट तर 8962 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची सरमिसळही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समक्ष झाली असून मतदान केंद्रावरील सर्व मशीन सीलबंद करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
पुण्यात 303 उमेदवार
पुणे जिल्ह्यात एकूण 8462 मतदान केंद्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार उभे आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88 लाख 49 हजार 590 एवढी आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 79 हजार 216 तर महिला मतदारांची 42 लाख 79 हजार 569 आहे. जिल्ह्यात 805 तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात असून चिंचवडमध्ये 6 लाख 63 हजार मतदार आहेत. इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र आहेत.
मतदानाचे अपडेट कुठे पाहाल?
https://www.youtube.com/watch?v=qcZNKRVp7G4
https://www.youtube.com/watch?v=PXRUc5O4J84