हरियाणातील विजयानंतर महायुतीतील भाजपची पॉवर वाढली, आठवडाभरात पहिल्या यादीची होणार घोषणा ?

भारतीय जनता पक्षासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या आठवड्याभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हरियाणातील विजयानंतर महायुतीतील भाजपची पॉवर वाढली, आठवडाभरात पहिल्या यादीची होणार घोषणा ?
भाजप
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 9:38 AM

विधानसभा निवडणुकांचे रणशिंग येत्या काही दिवसांतच फुंकले जाईल. या वड्यात निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. महिन्याभराच्या अंतरावर असलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या आठवड्याभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. भाजपची उमेदवार निवडीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याची माहितीदेखील मिळत आहे. हरियाणातील निवडणुकीतील विजयानंतर महायुतीमध्ये भाजपची बार्गेनिंग पॉवरदेखील वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होऊ शकते.

हरियाणामध्ये भाजपची हॅटट्रिक

हरियाणामध्ये भाजपाने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. त्यानंतर आता सर्व लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांवर केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रातही भाजपची उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणामधील विजयानंतर भाजपने आता महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी जय्यत तयारी करत पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. त्यावेळी सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. उमेदवारांच्या नावांसाठी शेवटची चाचपणी या बैठकीत करण्यात आली. पहिली यादी आठवडाभरात जाहीर होईल, अशी माहीती मिळत आहे.

तसेच पुढील काळातही भाजपकडून बैठकांचं सत्र सुरूच असेल. मुंबई, कोकण , उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागासाठी येत्या दोन दिवसांत बैठका पार पडणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने उमेदवारी निश्चित केली जाणार आहे, सी माहिती सूत्रांनी दिली.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.