महाविकास आघाडीची जागा वाटपाची शेवटची बैठक, तासाभरापासून खलबतं; फॉर्म्युला फिक्स होणार?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ साठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपात काही पेच निर्माण झाले होते, परंतु आता तो सोडवण्यात आला आहे. मुंबईसह विदर्भातील काही जागांवरून मतभेद होते, परंतु आता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतील, असे ठरवण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीची जागा वाटपाची शेवटची बैठक, तासाभरापासून खलबतं; फॉर्म्युला फिक्स होणार?
महाविकासाआघाडी
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 2:14 PM

Mahavikasaaghadi seat sharing formula : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

आजच या जागांवर शिक्कामोर्तब

महाविकासआघाडीच्या या बैठकीला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थितीत आहेत. तर शरद पवार गटाकडून शरद पाटील, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे नेते उपस्थित असल्याचे बोललं जात आहे. यांसह काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थितीत आहेत. गेल्या दोन तासांपासून अधिक काळ महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक सुरु आहे. त्यामुळे आजच या जागांवर शिक्कामोर्तब हेईल, असे म्हटले जात आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीतील जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे. महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे. त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

Non Stop LIVE Update
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काहींचे पुनर्वसन होणार?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काहींचे पुनर्वसन होणार?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.