ठाकरे गटात इनकमिंग सुरु, महायुतीला मिळणार डबल धक्का, कोकणातील मोठा नेता करणार पक्षप्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाकरे गटात इनकमिंग सुरु, महायुतीला मिळणार डबल धक्का, कोकणातील मोठा नेता करणार पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 10:07 AM

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोठी इनकमिंग पाहायला मिळणार आहे. कोकणातील भाजपचा एक मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेला एक नेता अनेक वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार आहे.

राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मिळणार तिकीट

कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील आज स्वगृही ठाकरे गटात परतत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

राजन तेली यांच्या राजीनाम्याचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी राजन तेली यांनी भाजपच्या राजन तेली यांनी प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला होता. यानतंर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजीनामा देण्याची धक्कादायक कारणं सांगितली होती. माझ्या मतदारसंघात सध्या घराणेशाही सुरु आहे आणि ती घराणेशाही मला मान्य नाही. तसेच राणे परिवाराकडून होत असलेले अंतर्गत खच्चीकरण यालाही मी कंटाळलो आहे. त्यामुळेच मी राजीनामा देत आहे, असे राजन तेली यांनी म्हटले आहे.

नारायण राणेंसह दीपक केसरकरांना मोठा धक्का

राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे कोकणातील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागल्याचे बोललं जात आहे. कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हे उद्या मातोश्रीवर ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. दुपारी चारच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे कोकणात राजन तेली विरुद्ध मंत्री दीपक केसरकर यांच्यात लढत होणार असल्याचे बोललं जात आहे. राजन तेली यांच्या प्रवेशामुळे भाजप आणि नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार गटाचे दीपक साळुंखेही हाती घेणार ‘मशाल’

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतच भाजपलाही ठाकरेंच्या सेनेकडून धक्का देण्यात आला आहे. सांगोल्यातून अजित दादा गटाचे दीपक आबा साळुंखे हे आज संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रवेश करणार आहेत. तर भाजपच्या राजन तेली यांचा 5 वाजता होणार पक्षप्रवेश केला जाणार आहे. तसेच चिंचवड येथील अजित दादा गटाचे मोरेश्वर बोन्डवे यांचा 6 वाजता प्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. मात्र सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेतून दीपक आबा साळुंखे उतरणार मैदानात उतरणार आहेत.

गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक साळुंखे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.