महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? विजयानंतर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले…

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? विजयानंतर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले...
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 3:58 PM

CM Eknath Shinde First Reaction : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या कलानुसार तब्बल १२५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट ५५ आणि अजित पवार गट ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर महाविकासआघाडी फक्त ५१ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले. आम्ही अडीच वर्षात जे काम केले, त्याची पोचपावती आम्हाला जनतेने दिली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?  

“महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे अभिनंदन करतो. मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, हे मी आधीपासून सांगत होतो. मी मतदारांचे अभिनंदन करतो. माझ्या लाडक्या बहि‍णींचेही आभार मानतो. लाडक्या बहि‍णींनी मतदान केले. लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केले. त्यासोबतच माझ्या लाडक्या भावांनी मतदान केले. तसेच जेष्ठ मतदारांनीही मतदान केलं. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केले. आम्ही अडीच वर्ष जे काम केले, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मतदारांनी दिली. त्यामुळेच महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. आम्ही अडीच वर्षात जे काम केले, त्याची पोचपावती आम्हाला जनतेने दिली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“लाडक्या बहि‍णींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. लाडक्या भावांनी मतदान केलं. तसेच लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं. आम्ही अडीच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं. त्या कामाचं मोजमाप, कामाची नोंद, कामाची पोहोच पावती राज्यातील जनतेने आम्हाला दिली आहे. मी माझ्या मतदारसंघातील जनतेचेही आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकमेकांना पेढे भरत विजय साजरा

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि एकनाथ शिंदे गटालाही अभूतपूर्व यश मिळालं. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी एकमेकांवर पेढे भरवत त्यांनी विजयी गुलाल उधळला.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....