…अन् पुन्हा बॅग चेकिंगसाठी आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांचीच उद्धव ठाकरेंकडून उलट तपासणी

वणीनंतर औसामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तपासणी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या आयकार्डची मागणी केली.

...अन् पुन्हा बॅग चेकिंगसाठी आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांचीच उद्धव ठाकरेंकडून उलट तपासणी
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 4:55 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची सोमवारी वणीमध्ये हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.

यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केल्याचं पहायला मिळालं. उद्धव ठाकरे हेलीपॅडवर उतरले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगेची तपासणी करायची आहे असं सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचं आयकार्ड दाखवायला सांगितलं. आयकार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी केली. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात याची देखील चौकशी केली. त्यानंतर तुम्ही तुमचं पाकीट देखील दाखवा त्यात किती पैसे आहेत असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

दरम्यान कधीपासून नोकरी करत आहात? आतापर्यंत किती जणांना तपासलं असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला, तेव्हा तुम्ही पहिलेच आहात असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेव्हा मीच आहे का पहिलं गिऱ्हाईक असा खोचक टोला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. सगळ्यांची नावं आली आहेत माझ्याकडे आता तुम्हाला टीव्हीवर चांगली प्रसिद्धी मिळेल असंही उद्धव ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांना म्हटलं.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. त्यांच्या बॅगेची तपासणी का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.