‘बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और…’ अमरावतीतून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे, अमरावतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

'बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और...' अमरावतीतून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 6:45 PM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमरावतीच्या प्रचार सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सुख मे जो साथ देते है  वह रिश्ते होते है, जो दुःख मे साथ देते है वह फरिश्ते होते है,’ या शेरोशायरीसह उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, यशोमती ठाकूर माझी लाडकी बहीण आहे, त्यांना दुप्पट मतांनी निवडून आणलं पाहिजे असं आवाहनही यावेळी ठाकरे यांनी केलं.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांच्यावर संस्कार झाले नाहीत ते काहीही बोलतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पण  प्रत्येक वेळी बोलाल तर आम्ही इंगा दाखवणार असं नाही, फक्त ती वेळ यायची आहे, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे बोलताना ते म्हणाले की,  आठ तारखेला जो चिन्हाचा निर्णय होणार होता, तो पुढे ढकलला आहे. न्यायाचा तमाशा आणि बाजार मांडला आहे यांनी.  आता त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढली आहे. देवेंद्र फडणवीस बोलले संविधानाचं कव्हर लाल आहे, आपलं रक्त पण लाल आहे.  आम्ही जेव्हा कर्जमाफी केली तेव्हा आम्ही कर्तव्य केले होते, जाहिरात केली नव्हती. असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेगे  अशी या सरकारची निती आहे.  जीएसटीचे पैसे देखील सरकारने खाल्ले. सर्व विकास उदयोग पळविण्यासाठी गुजरातला देण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. रोजगार, उदयोग कुठं गेले? तुम्ही रोजगारासाठी आता गुजरातला जाणार का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला तर विकास होईल, आमचं सरकार आलं तर दोघांना सुद्धा मोफत शिक्षण देणार अशी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.