घरात मृतदेह तरीही कुटुंबियांनी पूर्ण केलं मतदानाचं कर्तव्य, हृदय पिळवटून टाकणारी घटना ऐकाल तर…

मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. काल राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. असंख्य नागरिक, नेते, सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत मतदान केलं.

घरात मृतदेह तरीही कुटुंबियांनी पूर्ण केलं मतदानाचं कर्तव्य, हृदय पिळवटून टाकणारी घटना ऐकाल तर...
मतदान
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 11:09 AM

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी काल ( 20 नोव्हेंबर) राज्यभरात एकाच टप्प्यात पार पडलं. राज्यात एकूण 65 टक्के मतदान झालं. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. काल राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. असंख्य नागरिक, नेते, सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत मतदान केलं. पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये तर हळदीच्या मंडपातून येवून एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला.

मात्र याच मतदानादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी एक घटनादेखील समोर आली आहे. संपूर्ण राज्यातील नागरिक मतदान करत असताना जळगावच्या चाळीसगावमध्य मात्र एक हृदयद्रावक प्रसंग घडला. घरातील महिलेचा मृत्यू झालेला असतानाही त्या घरातील इतर कुटुंबियांनी बाहर पडून मतदानाचे कर्तव्य पार पाडलं. हे पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले. कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले, हा सर्वांसाठीच एक डोळे उघडणारा प्रसंग होता.

पत्नीच्या मृत्यूचं दुःख पचवून मतदानाला गेले

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कळमळू गावातील ही घटना आहे. तेथे राहणारे राजेंद्र बच्चे यांच्या पत्नीचे मतदानाच्या दिवशीच (20 नोव्हेंबर) निधन झाले. घरातील कर्ती स्त्री गेल्याने सर्वच शोकाकुल अवस्थेत होते. राजेंद्र यांच्या मुलाची चार महिन्यांपूर्वीच अग्निवीर भरतीत निवड झाली होती. मुलगा हा सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी गेला होता, त्यामुळे तो त्याच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी देखील येऊ शकला नाही. राजेंद्र बच्चे, त्यांची मुलगी आणि इतर कुटुंबियांनीच त्या महिलेला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. घरात एवढा दुःखद प्रसंग घडूनही बच्चे कुटुंबिय डगमगले नाहीत. त्यांनी घराबाहेर पडून त्यांचे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. त्यांच्या या धैर्याचे, राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सर्वांनी आदर्श घ्यावा अशीच त्यांची ही कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

23 नोव्हेंबरला होणार मतमोजणी

विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झालं तर शनिवार, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षामध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले, दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत भाजपला पाठिंबा दिला आणि सत्तेत सहभागी झाले. दोन प्रमुख पक्षांच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून मतदारा राजा कोणाला कौल देतो, राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येतं की मविआ सत्ता स्थापन करेल, हे चित्र 23 तारखेला स्प्ष्ट होईल. त्याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.