बारामतीत कुणाला धक्का? अजितदादा की युगेंद्र यांना?; बड्या नेत्याचं भाकीत काय?

बारामती विधानसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

बारामतीत कुणाला धक्का? अजितदादा की युगेंद्र यांना?; बड्या नेत्याचं भाकीत काय?
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 9:26 PM

बारामती विधानसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.  बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

‘देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केल्यास महायुतीचे पाच ते सात टक्के मते कमी होतील. अमित शहा यांचा या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता बस झालं असं सांगण्यात आलं आहे. अजितदादांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या जागा कमी आणून आपले महत्त्व वाढवायचे आहे, भाजपलाही शिंदे यांच्या जागा कमी करायच्या आहेत. तर शिंदे यांना भाजपच्या जागा कमी आणायच्या आहेत. या सर्वांचा फायदा महाविकास आघाडीला होईल. असा दावा आमदार रोहित पवार यांनी करमाळा येथे बोलताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले की,  बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची देखील डोकेदुखी वाढली आहे. यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी अनेक उमेदवार झाल्याने आज आणि उद्यामध्ये सर्व वरिष्ठ नेते ही बंडखोरी कमी करून एका ठिकाणी एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील असे सांगत यंदा प्रत्येकाला महाविकास आघाडी जिंकणार असल्याची खात्री असल्याने जास्तीत जास्त उमेदवारांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी दाखल केल्याचेही त्यांनी म्हटलं.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....