महायुतीचा मुख्यमंत्री ठरला, अमित शाहांनी दिले मोठे संकेत, म्हणाले “महाराष्ट्रात पुन्हा…”

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे.

महायुतीचा मुख्यमंत्री ठरला, अमित शाहांनी दिले मोठे संकेत, म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा...
अमित शाह
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 4:07 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रात पहिली सभा पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीत सभा पार पडली. यावेळी अमित शाह भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेद दिले. तसेच महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही त्यांनी जाहीरपणे भाष्य केले.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच महायुती किंवा महाविकासआघाडी दोघांनीही अद्याप मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. नुकतीच सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे.

महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा

“महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे”, असे अमित शाह यांनी म्हटले.

“सांगलीवाल्यांनो ऐका, येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला महायुती सरकार बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राला विश्वास आहे. त्यामुळे सांगलीत पुन्हा कमळ फुलणार आहे. आपले मतदान हे सुधीरदादांना नाही, तर भारत देशाला मजबूत आणि समृद्ध बनवण्याचे काम करणार आहे. 2027 पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे”, असेही अमित शाह म्हणाले.

“काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनी जातीच्या आधारावर विभागून देशाला कुमकुवत बनवत आहेत. शरद पवारांच्या चार पिढ्या जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणू शकत नाहीत. ’नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे म्हणत कलम 370 परत आणण्याची मागणी केली आहे. आज मी संभाजी महाराजांच्या भूमीवरून म्हणतोय – शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आम्ही कलम ३७० परत येऊ देणार नाही”, असेही अमित शाह म्हणाले.

“आघाडीचे लोक देश सुरक्षित करु शकत नाही”

“राहुल गांधी तुम्ही काय, तिसरी पिढी सुध्दा 370 हटवू शकणार नाही. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार सर्वजण ओरडत आहेत. पण कोणाचीही बोलायची हिंमत नाही. आघाडीचे लोक देश सुरक्षित करु शकत नाही. तसेच देशाची इज्जतही वाढवू शकत नाही. हे काम करायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे लागतील. भगवान श्रीराम ५०० वर्षे तंबूत बसले होते. काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या कामाला थारा देत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा पाच वर्षात त्यांनी भूमिपूजनही केले आणि राम मंदिर बांधून पावन केले”, असेही अमित शाहांनी म्हटले.

“पंतप्रधान मोदींनी वक्फ बोर्ड बदलण्यासाठी विधेयक आणले आणि विरोधक मुद्दाम या गोष्टीला विरोधक करत आहेत. कर्नाटकच्या वक्फ बोर्डाने मंदिर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीसह संपूर्ण गाव वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केले. उद्धवजी, तुम्ही वक्फला विरोध करणार का? महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फला हस्तांतरित करतील”, असेही अमित शाहांनी म्हटले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.