देवेंद्र फडणवीस यांची अचानक सुरक्षा वाढवली, एसआयडीचा गोपनीय रिपोर्ट काय?

महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेच्या सूचनेनुसार, त्यांना धमकी असल्याचे समजले आहे. त्यांच्या निवासस्थानावर अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि फोर्स वन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची अचानक सुरक्षा वाढवली, एसआयडीचा गोपनीय रिपोर्ट काय?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 3:03 PM

Devendra Fadnavis Security Increase : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षिततेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तहेर संस्थेने दिलेल्या एका सूचनेनंतर देवेंद्र फडणवीसांच्या संस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या बंगल्यावर विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. एसआयडीने दिलेल्या गोपनीय रिपोर्टमुळे देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अलर्टवर आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार?

देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाच्या बारा जवानांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाकडे शस्त्र असून ते शस्रधारी जवान आता सध्या फडणवीसांची सुरक्षा सांभाळत आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या पोलिसांच्या विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र गुप्तहेर संस्थांना मिळालेल्या सूचनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आली आहे. त्या अंतर्गत फोर्स वनचे जवान त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले आहेत.

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतरही सुरक्षेत वाढ

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.