मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू पहाटे पहाटेच जरांगे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?, जरांगे बॅकफूटवर येणार?

आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीतील मराठा मतांचा फटका पाहून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. विविध पक्षातील नेते रात्री किंवा पहाटे त्यांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू पहाटे पहाटेच जरांगे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?, जरांगे बॅकफूटवर येणार?
eknath shinde and manoj jarange patil
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 10:18 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. . त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

बजरंग सोनवणे यांनी घेतली भेट

तर दुसरीकडे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विविध पक्षातील राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. काल बीडचे खासदार आणि शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यात 6 विधानसभा आहेत. त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे. यानंतर बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया देताना ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे, असे म्हटले होते.

मनोज जरांगे पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझी जरांगेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. बीड जिल्ह्यातील 6 जागा मागणे काही गैर नाही. पण तरी एखादी जागा महाविकास आघाडी किंवा मित्र पक्षाला जाईल. बीडमध्ये आमच्या सहा विधानसभा निवडून येतील, असा मला विश्वास आहे, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले.

सुरेश वरपूडकरही मनोज जरांगेच्या भेटीला

तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. पाथरी विधानसभा मतदार संघात मराठा समाज निर्णायक असल्याने या ठिकाणी जरांगे पॅटर्न चालतो. याच कारणामुळे वरपूडकर यांनी भेट घेतली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तसेच बीडमधील केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या संगीता ठोंबरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संगीता ठोंबरे यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेऊन तुतारी चिन्हावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बीडमध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालत असल्याने संगीता ठोंबरे यांनी जरांगेंची भेट घतली. त्यासोबतच परभणी विधानसभेचे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राहुल पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मनोज जरांगेंसोबतच्या भेटीगाठी महत्त्वाच्या

दरम्यान बजरंग सोनावणे, सुरेश वरपूडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटील हे सर्व नेते मराठवाडा तसेच बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत. या सर्व नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा केली. सध्या जे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्या नेत्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील पॅटर्न चालत आहे. त्यामुळे या भेटीगाठी महत्त्वाच्या असल्याचे बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी.
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी.
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.