महायुती आणि महाविकासआघाडीची डोकेदु:खी वाढणार, कोणाचे किती बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल? पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक बंडखोर उमेदवारांचा शोध लागत नसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना हे बंडखोर उमेदवार संपर्कात नसल्याने राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल आणि राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

महायुती आणि महाविकासआघाडीची डोकेदु:खी वाढणार, कोणाचे किती बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल? पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 2:58 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकीकडे महायुती आणि महाविकासाघाडीत बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे काही बंडखोर उमेदवार हे नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे महाविकासआघाडी आणि महायुतीतील नेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या या उमेदवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पालघरमध्ये महायुतीचे ३ उमेदवार नॉट रिचेबल

पालघर विधानसभा मतदारसंघाचे भाजप बंडखोर उमेदवार अमित घोडा अजूनही नॉट रिचेबल असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महायुतीतील जिल्ह्यातील बंडखोर 3 ही उमेदवार नॉट रिचेबल असल्याने महायुतीची डोकेदु:खी वाढली आहे. अमित घोडा यांना डावलण्यात आल्याने त्यांनी पालघरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र अमित घोडा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि जगदीश धोडी असे तिघेही नॉट रिचेबल असल्याने ते उमेदवारी मागे घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विमानाने एबी फॉर्म पाठवलेले उमेदवार नॉट रिचेबल

नाशिकच्या देवराळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार असताना शिवसेनेने राजश्री अहिरराव यांना विमानाने एबी फॉर्म पाठवला होता. तर दिंडोरी मतदारसंघात देखील राष्ट्रवादीचा उमेदवार असताना शिवसेनेने धनराज महाले यांना एबी फॉर्म दिला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. देवळालीतून राजश्री अहिरराव तर दिंडोरी मधून धनराज महाले यांना थेट विमानातून ए बी फॉर्म देण्यात आला होता. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी थेट विमानातून येऊन एबी फॉर्म दिला होता. आज माघारीच्या दिवशी मात्र दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांच्यासमोर धनराज महाले यांना ए बी फॉर्म देण्यात आला आहे. तर देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांच्यासमोर राजश्री अहिरराव यांना ए बी फॉर्म देण्यात आला आहे.

अविनाश लाड नॉट रिचेबल

तसेच रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि बंडखोर उमेदवार अविनाश लाड नॉट रिचेबल झाले आहेत. अविनाश लाड नाँट रिचेबल झाल्याने राजापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अविनाश लाड हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन साळवींच्या अडचणी वाढणार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बंडखोरी केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांना ही जागा सुटल्याने काँग्रेसने या जागेसाठी आग्रही मागणी केली होती.

विक्रमगडमध्येही पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली

पालघर विक्रमगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रकाश निकम हे नॉट रिचेबल झाले आहेत. प्रकाश निकम हे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. प्रकाश निकम हे कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. निष्ठावंताना डावलल्याने तसेच वरिष्ठांनी शब्द फिरवल्याने महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीला बंडाचे ग्रहण लागले आहेत. महायुतीचे भाजपचे विक्रमगड विधानसभेचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हे बंड शमविण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. हे उमेदवार नॉट रिचेबल असताना आता विक्रमगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील आता नाॉट रिचेबल झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.

हिंगोलीतही भाजप बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

हिंगोलीत भाजपचे बंडखोर नेते रामदास पाटील सुमटाणकर हे नॉट रिचेबल झाले आहेत. भाजपामधून बंडखोरी करत रामदास पाटील यांनी हिंगोली विधासभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला आहे. त्यातच आता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रामदास पाटील सुमटानकर नॉट रिचेबल झाले आहेत. हिंगोली विधानसभेत महायुतीकडून भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजेश लाटकर नॉट रिचेबल

कोल्हापुरात ही काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले आहेत. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. राजेश लाटकर हे सकाळपासून अज्ञातस्थळी आहेत. राजेश लाटकर हे नाराज आहेत. नाराजी दूर करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह मधुरिमा राजे छत्रपती यांनीही लाटकर यांची भेट घेतली होती.

Non Stop LIVE Update
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....