288 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? आकडा उघड; तुमच्या जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या घ्या जाणून

महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ४१४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २०१९ च्या तुलनेत हा आकडा २८ टक्क्यांनी जास्त आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील कडवी लढत पाहायला मिळणार आहे.

288 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? आकडा उघड; तुमच्या जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या घ्या जाणून
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:49 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. काल अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर अखेर विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रिंगणात 4 हजार 140 उमेदवार उतरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने एकूण किती उमेदवार रिंगणात उतरले आहेत, याची माहिती दिली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी 7 हजार 078 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 4 हजार 140 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

2019 पेक्षा 28 टक्क्यांनी वाढला आकडा

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी 4 हजार 140 उमेदवार मैदानात उतरले आहेत. हा आकडा 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांसाठी 3 हजार 239 उमेदवार रिंगणात उतरले होते.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक उमेदवार कोणत्या मतदारसंघात?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी फक्त तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर बीडच्या माजलगाव मतदारसंघातून सर्वाधिक 34 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच मुंबईतील 36 जागांवर 420 उमेदवार, पुणे जिल्ह्यातील 21 जागांवर 303 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम कसा?

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. आता येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.