महायुती की महाविकासआघाडी, कोणाचे सर्वाधिक उमेदवार जाहीर? पाहा यादी
यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या युती-आघाडीतील विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला नुकतीच सुरुवात झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या युती-आघाडीतील विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होत आहे.
महाविकासआघाडीकडून आतापर्यंत किती उमेदवारांची घोषणा?
महाविकासआघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात महाविकासआघाडीकडून आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकासाआघाडीकडून २८८ पैकी २३९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ८७, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ८५ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ६७ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाविकासआघाडीकडून आतापर्यंत किती उमेदवारांची घोषणा?
तर दुसरीकडे महायुतीकडून २१५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १२१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून 49 उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत.
महाविकासआघाडी
•काँग्रेस: 87 •शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 85 •राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 67 •एकूण जाहीर जागा: 239 •बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत): 49 •एकूण जागा: 288
महायुती
•भारतीय जनता पार्टी (BJP): 121 •शिवसेना (शिंदे गट): 45 •राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 49 •एकूण जाहीर जागा: 215 •बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत): 73 •एकूण जागा: 288