बदलापूर प्रकरणातील ‘ती’ रणरागिणी निवडणुकीच्या रिंगणात, मनसेकडून किती महिलांना तिकीट?

महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर आतापर्यंत मनसेने एकूण ४७ उमेदवार जाहीर केले आहेत.

बदलापूर प्रकरणातील 'ती' रणरागिणी निवडणुकीच्या रिंगणात, मनसेकडून किती महिलांना तिकीट?
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 8:12 AM

MNS Women Candidates For Vidhansabha election : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. त्यातच नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी उमेदवार यादी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवार यादीत 45 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.

मनसेने काल रात्री उशिरा आगामी विधानसभा निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीत ४५ जणांचा समावेश असून मनसेकडून आतापर्यंत ४७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मनसेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दोन महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी

मनसेने जाहीर केलेल्या यादीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगिता चेंदवणकर या मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पण संगिता चेंदवणकर यांच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल झाला होता. तसेच बदलापूरकरांनी जनआंदोलनही केले होते. याचे नतेृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते. या घटनेला वाचा फोडणाऱ्या संगिता चेंदवणकर यांचे राज ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच आता संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला संधी

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून गेवराई मतदारसंघातून सौ. मयुरी बाळासाहेब म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात अनेक महत्त्वपूर्ण लढाई पाहायला मिळणार आहेत.

मनसे उमेदवारांची संपूर्ण यादी

कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील माहीम – अमित राज ठाकरे भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत वरळी – संदीप देशपांडे ठाणे शहर – अविनाश जाधव मुरबाड – संगिता चेंदवणकर कोथरुड – किशोर शिंदे हडपसर – साईनाथ बाबर खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे मागाठाणे – नयन प्रदीप कदम बोरीवली- कुणाल माईणकर दहिसर- राजेश येरुणकर दिंडोशी – भास्कर परब वर्सोवा – संदेश देसाई कांदिवली पू- महेश फरकासे गोरेगांव – विरेंद्र जाधव चारकोप – दिनेश साळवी जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे विक्रोळी – विश्वजित ढोलम घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे चेंबूर – माऊली थोरवे चांदिवली – महेंद्र भानुशाली मानखुर्द – शिवाजीनगर – जगदीश खांडेकर ऐरोली – निलेश बाणखेले बेलापूर – गजानन काळे मुंब्रा-कळवा – सुशांत सूर्यराव नालासोपारा – विनोद मोरे भिवंडी पश्चिम- मनोज गुळवी मिरा-भाईंदर – संदीप राणे शहापूर – हरिश्चंद्र खांडवी गुहागर – प्रमोद गांधी कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी आष्टी- कैलास दरेकर गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के औसा – शिवकुमार नागराळे जळगांव शहर – अनुज पाटील वरोरा – प्रवीण सूर सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे कागल – रोहन निर्मळ सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे तासगांव-कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी श्रीगोंदा – संजय शेळके हिंगणा – विजयराम किनकर नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर सोलापूर शहर – उत्तर – परशुराम इंगळे

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.