मनसे देणार महाविकासआघाडीतील ठाकरे गटाला पाठिंबा, राजकीय वर्तुळात खळबळ

मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकासआघाडीला मदत करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनसे देणार महाविकासआघाडीतील ठाकरे गटाला पाठिंबा, राजकीय वर्तुळात खळबळ
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 12:14 PM

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी जवळपास 7 हजारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकासआघाडीला मदत करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतंच अंबरनाथमील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. तर मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी दिली आहे.

राजू पाटील-राजेश वानखेडेंची भेट

अंबरनाथमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला आज मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहिले. यावेळी अंबरनाथमधील महाविकासआघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली. यानंतर त्या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांना वानखेडे यांना मदत करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात खळबळ

त्यावर ते म्हणाले, “राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार”, अशी भूमिका राजू पाटील यांनी जाहीर केली. तर याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता ते म्हणाले, सर्व मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील याची मला खात्री नाही तर गॅरंटी आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या भेटीमुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.