मनसेची पुढील उमेदवारी यादी कधी येणार? राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाने थेट तारीखच सांगितली, म्हणाला…

मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून 45 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर काल मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

मनसेची पुढील उमेदवारी यादी कधी येणार? राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाने थेट तारीखच सांगितली, म्हणाला...
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 10:10 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादींची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीन उमेदवारी याद्या घोषित करण्यात आल्या आहेत. मनसेकडून आतापर्यंत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आता मनसेची पुढील उमेदवारी यादी कधी येणार याची माहिती समोर आली आहे.

मनसेकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा

मनसे नेते राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरेंनी यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मनसेकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले जात आहेत. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून 45 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर काल मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यानुसार आतापर्यंत मनसेकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतंच ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेची पुढील यादी कधी आणि किती तारखेला येणार, याबद्दल भाष्य केले आहे. बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. बाळा नांदगावकर यांनी आज मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली.

बाळा नांदगावकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

“मी आज सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी आलो आहे. मला सकाळी उठणारी माणसं खूप आवडतात. मी दर दिवशी सकाळी एक ते दीड तास वॉक करतो. आता सध्या जिम बंद केले आहे. पण सकाळ सकाळी येऊन काही लोकांना भेटतो. माझ्याकडे काही साहित्य आहे, ते लोकांना देतो. मी उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माझा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब स्वत: हजर राहणार आहेत”, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

“समोरचा उमेदवार हा विरोधक नसतो”

“निवडणुकीच्या मैदानात खेळीमेळीचे वातावरण असायला हवं. समोरचा उमेदवार हा विरोधक नसतो किंवा दुश्मन नसतो. तो देखील लोकांची सेवा करायला उभा असतो. गेल्या अनेक वर्षापासून राजकारण ढवळून निघालं आहे. माझ्यासमोर महात्मा गांधीजींचा आदर्श आहे. आपण स्वतः जे काही असेल ते करायचं नंतर मग कार्यकर्त्यांना किंवा लोकांना करायला सांगायचा आदर्श मी कायम पाळतो”, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

मनसेची पुढील यादी ‘या’ तारखेला

यावेळी बाळा नांदगावकरांना शिवडी विधानसभेतून ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “खरंतर गटनेत्याचे नाव येणे अपेक्षित होतं. गटनेता हा महत्त्वाचा असतो. शिंदे जेव्हा बाजूला झाले तेव्हा अनेकांना अमिष दिली असं म्हटलं जातंय. आम्ही ऐकतोय की पैसे देऊन लोकांना खरेदी करण्यात आले. पण त्या काळातही अजय चौधरी हे पक्षासोबत राहिले. पण याबद्दल मातोश्रीवरुन काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेकडून पुढील यादी येत्या २६ किंवा २७ ऑक्टोबरला प्रदर्शित केली जाणार आहे. या यादीत कोणाचे नाव असणार, किती जण असणार याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही”, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.