विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, खुद्द पंतप्रधान मोदी 8 दिवस महाराष्ट्रात तंबू ठोकणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. येत्या निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत.

विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, खुद्द पंतप्रधान मोदी 8 दिवस महाराष्ट्रात तंबू ठोकणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 3:38 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. एकीकडे विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांचा प्रचार कसा करायचा, याचे वेळापत्रक ठरवले जात आहे. त्यातच आता महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच अनेक पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडका पाहायला मिळणार आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात 8 दिवस जाहीर सभा घेणार आहेत.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा होणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विभागवार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ नोव्हेंबरपासून विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. मात्र या कालावधीतही जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे महायुतीचा कल असणार आहे.

महायुतीकडून १८२ उमेदवारांची यादी जाहीर 

दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशीच थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर निवडणुका लढवताना दिसणार आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.