“पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करणार का?” संजय राऊतांचा संताप, म्हणाले “निवडणूक आयोग…”

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करणार का? संजय राऊतांचा संताप, म्हणाले निवडणूक आयोग...
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 10:23 AM

Sanjay Raut on Uddhav Thackeray Bag Check : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला जात आहे. नुकतंच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची एक सभा नाशिकच्या वणीमध्ये आयोजित करण्यात आली. वणीमधील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

“शिंदेंच्या उमेदवारांना २५ कोटी पोहोचले”

“एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांना आतापर्यंत २५ कोटी रुपये पोहोचले आहेत. काही नाक्यांवर सांगोल्यावर पकडण्यात आले. १५ कोटी रुपये पकडले. गाडी कोणाची काही सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे. १५ कोटी पकडले आणि रेकॉर्डवर फक्त ५ कोटी दाखवले. १० कोटींचा हिशोब कुठे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“तपासणीला आमचा आक्षेप नाही”

“उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे. मग मुख्यमंत्री, गृहमंत्री कोणीही असतील तरी… पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातून इतक्या बॅगा उतरतात त्या कसल्या असतात? अमित शाहांच्या ताफ्यातूनही बॅगा उतरतात”, असे संजय राऊत म्हणाले.

दोन तासासाठी थांबले मग इतक्या बॅगा कशासाठी? 

“लोकसभेच्या वेळी मी स्वत एक व्हिडीओ केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका तासासाठी नाशिकमध्ये गेले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून १५ ते १६ बॅगा उतरल्या होत्या. एक तासासाठी इतके कपडे माणूस घेऊन जातो का? शिंदे शिर्डीला गेले तेव्हाही त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरल्या होत्या, त्या कसल्या होत्या. दोन तासासाठी थांबले मग इतक्या बॅगा कशासाठी? तुम्ही आमच्या तपासण्या करता, मग यांच्या कोणी करायच्या. करणार आहात की नाही. यंत्रणा विकत घेतली गेली का? खोके तुम्हालाही पोहोचलेत? हा आमचा प्रश्न आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.