आताची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाचे आणखी 9 उमेदवार रिंगणात, पाहा संपूर्ण यादी

सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटाकडून अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.

आताची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाचे आणखी 9 उमेदवार रिंगणात, पाहा संपूर्ण यादी
जयंत पाटील आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 3:27 PM

Sharad Pawar NCP Candidate List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत ९ जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार

  • वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी
  • चिंचवड – राहुल कलाटे
  • माजलगाव – मोहन जगताप
  • परळी – राजेसाहेब देशमुख
  • हिंगणा – रमेश बंग
  • अणुशक्तीनगर – फहद अहमद
  • मोहोळ – सिद्धी कदम
  • भोसरी – अजित गव्हाणे
  • हिंगणघाट – अतुल वांदिले

शरद पवार गटाकडून 11 महिलांना उमेदवारी

सिद्धी कदम हिने टाटा इन्स्टिट्यूटमधील पोस्ट ग्रॅड्युऐशन केले आहे. ती अत्यंत सुशिक्षित मुलगी आहे. ती मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती एनजीओमध्ये काम करत आहेत. सिद्धी कदम हिला उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून ११ महिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, अशीही माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

उर्वरित उमेदवारांची उद्या घोषणा

“आम्ही फक्त लाडकी बहीण म्हणून नुसती घोषणा करत नाही. तर कृतीशील कार्यक्रम आम्ही केला आहे. आम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाला जितक्या जागा मिळाल्या, त्या जागांवर आम्ही उमेदवारी घोषित केली आहे. तसेच उर्वरित जागांवरील उमेदवारांबद्दल उद्या किंवा परवा घोषणा करु”, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

महाविकासआघाडीतून आतापर्यंत किती उमेदवार जाहीर?

•काँग्रेस: 87
•शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 85
•राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 76
•एकूण जाहीर जागा: 239
•बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत): 49
•एकूण जागा: 288
Non Stop LIVE Update
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.
समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार? शिंदेंकडून हे 5 संभाव्य उमेदवार
समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार? शिंदेंकडून हे 5 संभाव्य उमेदवार.
'विधानसभा लढतोय आणि मीच...', मलिक अपक्ष लढण्यावर ठाम, पण फायदा कोणाचा?
'विधानसभा लढतोय आणि मीच...', मलिक अपक्ष लढण्यावर ठाम, पण फायदा कोणाचा?.
सदा सरवणकरांचं तिकीट रद्द होणार? अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा पण...
सदा सरवणकरांचं तिकीट रद्द होणार? अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा पण....
भाजप अन् शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, कोणाविरूद्ध कोण लढणार?
भाजप अन् शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, कोणाविरूद्ध कोण लढणार?.