शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार? म्हणाले “फक्त दीड वर्ष बाकी…”

सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार? म्हणाले फक्त दीड वर्ष बाकी...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 1:34 PM

Sharad Pawar On Retirement Plan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल”, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

“दुर्देवाने राज्याचे राज्यकर्ते काम करत नाही”

बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत शरद पवारांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. “शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोण चांगला राहतो. दुर्देवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही”

“मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही”, असे शरद पवार म्हणाले.

“कोणतीही निवडणूक लढणार नाही”

“मी सत्तेत नाही. राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे”, असे विधान शरद पवारांनी केले. त्यांच्या विधानमुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

“तरीही बारामतीकर भारी”

“माणसं मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो. कुणाचं काय करायचं कसली भावना कसलं काय. काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही भारी आहात, तुम्ही मतदान करायला कधी चुकता? कालची निवडणूक ताईंची झाली. ताईंची निवडणूक काय साधी होती का? निवडणूक घरातीलच होती. पण तरीही बारामतीकर भारी आहेत. या तालुक्याने ताईंना ४८ हजार मते अधिक दिले. हे काम तुम्ही केलं. आताही तुम्ही मागे पाहणार नाही. त्यामुळे मला चिंता नाही. उद्याच्या निवडणुकीत हाच दृष्टीकोन ठेवा”, असेही शरद पवारांनी यांनी म्हटले.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.