Maharashtra Politics News LIVE : विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या 5 जणांची नियुक्ती

| Updated on: Jun 28, 2024 | 8:03 PM

Maharashtra Assembly Session 2024 LIVE and Political News Marathi: आज 27 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Politics News LIVE : विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या 5 जणांची नियुक्ती
Big breaking

आजपासुन विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. महायुती सरकारचं हे अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पुणे कार अपघात प्रकरण, तसेच पुणे ड्रग्स प्रकरणाचे मुद्दे या अधिवेशनात गाजणार. सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज मुंबई हायकोर्टात 11 वाजता महत्वाची सुनावणी होणार आहे. सरकार आज कोर्टापुढे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. सगोसोयरेच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी आव्हान दिलं असून त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. ओबीसी नेते आज हायकोर्टात सुनावणीला ऊपस्थित राहणार आहेत. येत्या दोन दिवसात राजधानी दिल्लीत मान्सून बरसणार असून उकाड्यापासून दिल्लीकरांची सुटका होणार असल्याची चिन्ह आहेत. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह आसाम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jun 2024 05:52 PM (IST)

    हजारीबाग येथील ई-रिक्षा चालकाला सीबीआयने घेतले ताब्यात

    NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करत असलेल्या CBI ने हजारीबाग येथील एका ई-रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. ई-रिक्षा चालकाची सीबीआय गेस्ट हाऊसवर चौकशी करण्यात येत आहे. NEET चे पेपर फक्त ई-रिक्षाद्वारे एसबीआय बँकेत वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कुरिअर कंपनी ते एसबीआय बँक हे अंतर अवघे दीड किलोमीटर असून ते दोन तासांत कापण्यात आल्याचा आरोप आहे.

  • 27 Jun 2024 05:37 PM (IST)

    विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट

    विरोधी पक्षनेते बनल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. राहुल गांधी ओम बिर्ला यांना त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेटले. यावेळी सुप्रिया सुळे, डिंपल यादव, मिसा भारती, कनिमोळी आणि एनके प्रेमचंद्रन यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

  • 27 Jun 2024 05:25 PM (IST)

    NEET प्रकरणी सीबीआयने पाटण्यात 2 जणांना केली अटक

    NEET प्रकरणी सीबीआयने पाटणा येथून 2 जणांना अटक केली आहे. मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक करण्यात आली आहे. मनीष प्रकाश आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांची ने-आण करायचा, तर विद्यार्थ्यांना आशुतोषच्या घरी बसवायचे. NEET प्रकरणात सीबीआयने केलेली ही पहिली अटक आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

  • 27 Jun 2024 05:10 PM (IST)

    लालकृष्ण अडवाणी यांना एम्समधून डिस्चार्ज

    भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

  • 27 Jun 2024 04:12 PM (IST)

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून तालिका अध्यक्षपदी 5 जणांची निुयक्ती

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा आमदार संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ.किरण लहामटे आणि समाधान आवताडे यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

  • 27 Jun 2024 02:53 PM (IST)

    परभणी : ओबीसी अभिवादन यात्रा जिंतूरमध्ये पोहचली

    अभिवादन यात्रेचे जिंतूरमध्ये जंगी स्वागत झाले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

  • 27 Jun 2024 02:39 PM (IST)

    उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेचा हातोडा

    उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेचा हातोडा पडला आहे. पहाटेपर्यंत चालणारे हे बार अखेर बंद होणार आहेत. ऍपल आणि एंजल बारवर महापालिकेचा हातोडा पडला आहे.

  • 27 Jun 2024 01:57 PM (IST)

    जिल्हा परिषद शाळेला ‘अच्छे दिन’!

    सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अॅडमिशन हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. सोलापूरच्या मोहोळ मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत अॅडमिशन फुल्ल झालेत. एकीकडे झेडपी च्या शाळेत प्रवेश होत नसताना दुसरीकडे झेडपीच्या शाळेत आता ऍडमिशन हाऊसफुल झालेत.  त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेला अच्छे दिन आलेत. शाळेतील उपक्रमशीलतेमुळे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. दोन वर्षापूर्वी 7 पटसंख्या असलेल्या शाळेत आता 400 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या झालीय.

  • 27 Jun 2024 01:45 PM (IST)

    कल्याणमध्ये ठाकरे गट आक्रमक

    कल्याण परिवहन कार्यशाळेचे आदित्य ठाकरे यांही केलेल्या उद्घाटनाच्या नावाची ती पाटी काढली. कल्याणमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अधिकाऱ्याला घेरावा घातला. 24 तासात नावाची पाटी लागली नाही. तर अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरच्या पाट्या काढणार, असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेला दिला आहे. तर रस्त्याच्या कामामुळे पाटी काढली असून 24 तासात पाटी लावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • 27 Jun 2024 01:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू, असं उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसोबतच्या लिफ्टमधील भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 27 Jun 2024 01:20 PM (IST)

    अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    हा गाजर संकल्प आहे. उद्या गाजरं दाखवलं जात आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली. त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

  • 27 Jun 2024 01:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

    उद्या घोषणांचा पाऊस पडेल. पण हा गाजर अर्थ संकल्प आहे. पेपर लीक होत आहेत. राम मंदिर लीक होतंय. यांना याची लाज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 27 Jun 2024 12:56 PM (IST)

    कल्याणमध्ये ढाब्यांच्या नावाखाली सुरू आहेत खुलेआम हुक्का पार्लर

    तरुणाई नशेच्या विळख्यात , पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतात हुक्का पार्लर. कल्याणमधील बिर्ला कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या हुक्का पार्लरचा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती

  • 27 Jun 2024 12:26 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

    लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 27 Jun 2024 12:19 PM (IST)

    दरेकरांबद्दल ठाकरेंचे मोठे विधान

    यांना अगोदर बाहेर काढा असे ठाकरे यांनी दरेकरांना म्हटले आहे.

  • 27 Jun 2024 12:13 PM (IST)

    चंद्रकांत पाटील ठाकरेंच्या भेटीला

    चंद्रकांत पाटील हे ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.

  • 27 Jun 2024 12:12 PM (IST)

    विधानभवनात ठाकरे फडणवीस एकत्र

    विधानभवनात एकाच लिफ्टने जाताना ठाकरे आणि फडणवीस दिसले आहेत.

  • 27 Jun 2024 11:55 AM (IST)

    पुण्यातील अनधिकृत पब, बारवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

    पुण्यातील अनधिकृत पब, बारवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू आहे. पुण्यापाठोपाठ मीरा-भाईंदरमध्येही बुलडोझर कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कारवाई करा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 27 Jun 2024 11:50 AM (IST)

    दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं एकाच क्रमांकाचं आधारकार्ड

    जळगावच्या यावल तालुक्यात दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं एकाच क्रमांकाचं आधारकार्ड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावल तालुक्यातील विरावली इथली विद्यार्थिनी आणि यावल शहरातील एका विद्यार्थ्याचं एकाच क्रमांकाचं आधारकार्ड आहे. एकच आधारकार्ड क्रमांक असल्यामुळे कृतिका पाटील या विद्यार्थिनीला शैक्षणिक सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.

  • 27 Jun 2024 11:40 AM (IST)

    पुणे ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

    पुणे ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. L3 बारमधील पार्टीत अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीत अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. बारमध्ये दारू पितानाचा अल्पवयीन मुलगा सीसीटीव्हीत समोर आला आहे. पुणे गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.

  • 27 Jun 2024 11:30 AM (IST)

    दुधाच्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडं

    दुधाच्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडं घालण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाला प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान शासनाने तातडीने द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत अधिवेशनाआधी भेट घेऊन निवेदन देत ही मागणी केली.

  • 27 Jun 2024 11:20 AM (IST)

    धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात बैठक

    धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात बैठक बोलावली आहे. चौडीतील उपोषणकर्त्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे. अतुल सावेंनी ही तातडीची बैठक बोलावली आहे.

  • 27 Jun 2024 11:10 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 77 रुपये पिक विमा जमा

    छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 77 रुपये पिक विमा जमा झालं आहे. तर काही शेतकऱ्यांना 193 रुपये 99 पैसे मिळाले आहेत. अतिशय कमी पीक विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांची चेष्टा केली जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  • 27 Jun 2024 10:56 AM (IST)

    Maharashtra News : शिंदे आणि जरांगे यांची मिलीभगत – लक्ष्मण हाके

    “ओबीसी आरक्षणाचे संरक्षण कसे होईल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावे. जरांगे म्हणतात आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेऊ, मग मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे यांच्यात खरं कोण आणि खोटं कोण हे माहीत नाही. हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे. भटक्या विमुक्त जाती जमातींना आम्ही एक करीत आहोत. शिंदे आणि जरांगे यांची मिलीभगत आहे. जरांगे यांच्या आंदोलन रेड कार्पेट घातले जाते. मंत्री तानाजी सांवत हे मराठा म्हणून आंदोलनाला जात आहेत. हे बालिश आहे” असं ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले.

  • 27 Jun 2024 10:53 AM (IST)

    Maharashtra News : विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

    पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

  • 27 Jun 2024 10:46 AM (IST)

    Maharashtra News : दिवा रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षांची तोडफोड

    दिवा रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर उभ्या असलेल्या 12 रिक्षांची अज्ञात इसमाकडून तोडफोड. पहाटे सहा वाजता घटना घडली असून अज्ञात तरुणाने लोखंडी रॉडने केली तोडफोड. रिक्षा चालकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता चॉपर दाखवत तरुणाने काढला पळ. रिक्षा चालकांकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

  • 27 Jun 2024 10:22 AM (IST)

    Maharasshtra News : सत्ता येणार नाही हे माहीत असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ – विजय वडेट्टीवार

    आजपासून विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन. “सत्ता येणार नाही हे माहीत असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ. हे महाराष्ट्राला उद्धवस्त करणार त्रिकुटाच सरकार आहे. मविआच्या बैठकीत जे ठरेल तेच अंतिम असेल” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • 27 Jun 2024 10:12 AM (IST)

    Maharashtra News : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाचा वाद पेटला

    छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर भाजपचा दावा. अतुल सावे यांना पालकमंत्री देण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना. भागवत कराड, संजय केनेकर आणि शिरीष बोराळकर यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पालकमंत्री पदाची करणार मागणी. यापूर्वीच शिंदे गटाने भाजपला पालकमंत्री पद देण्याबाबत केला आहे विरोध.

  • 27 Jun 2024 10:09 AM (IST)

    Maharashtra News : बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही – संजय राऊत

    महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पाहिलं आहे. बिन चेहऱ्याच सरकार अजिबात चालणार नाही. सीएमपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोर जाण धोक्याच. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे आगामी विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची मागणी केली.

  • 27 Jun 2024 10:00 AM (IST)

    कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने पेटवली दुचाकी

    हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी दुचाकी पेटवून दिली. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावात मागच्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांची कर्ज माफि करा या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याने सरकारचा निषेध म्हणून शांताराम सावके या संतप्त शेतकऱ्याने दु-चाकी पेटवून दिली आहे.

  • 27 Jun 2024 09:50 AM (IST)

    बिल्डरने शेतकऱ्यावर रोखली बंदूक

    पुण्यातील धक्कादायक प्रकार बिल्डरने शेतकऱ्यावरती रिव्हॉल्वर रोखल्याचे समोर आले आहे. विश्रांतवाडीतील हा प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यावरती बंदूक रोखत त्याला धमकी देण्यात आली. बिल्डर प्रभाकर भोसले याने हा प्रकार केला. रांजणगाव येथील शेतकऱ्याची जमीन भोसले यांनी विकत घेतली होती. घरासाठी पैसे देतो म्हणून भोसलेंनी शेतकऱ्याला अर्धीच रक्कम दिली नंतर पैसे दिले नाही, असा आरोप आहे.

  • 27 Jun 2024 09:40 AM (IST)

    परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून मारहाण

    अहमदनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. चोरी करण्यासाठी घरात घुसल्याच्या संशयावरून परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. शहरातील सारस नगर भागात परप्रांतीय तरुणाचे झाडाला हात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकरणात 5 जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतले.

  • 27 Jun 2024 09:20 AM (IST)

    भाजपने पराभवाची केली कारण मीमांसा

    भाजपने लोकसभेतील सर्व पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला जवळपास सर्वच पराभूत उमेदवार उपस्थित होते. बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभूत उमेदवारांशी समोरासमोर चर्चा केली.

  • 27 Jun 2024 09:10 AM (IST)

    सोने-चांदीत नरमाईचे सत्र

    सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्यात सुरुवातीपासून भावात तेजीचे सत्र नव्हते. दोन्ही धातूत नरमाईचे सत्र दिसले. गेल्या दोन आठवड्यातील ट्रेंड या पण आठवड्यात कायम आहे. आता अखेरच्या सत्रात सोने आणि चांदी किती उसळी घेते हे लक्षात येईल.

  • 27 Jun 2024 09:00 AM (IST)

    आता ओबीसी हिताची चर्चा करा- लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे

    सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला ओबीसी बांधवांचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारवरचा भरोसा उडाल्यामुळे आम्ही हे आंदोलन केले आहे. आणि आता जनतेत जात असल्याचे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. सगे सोयरे आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र नोंदणीला आमचा विरोध आहे. 54 लाख नोंदी जर तुम्ही कुणबी म्हणून केला असाल तर ओबीसींच आरक्षण हे पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही ते सांगावे, अनेक आमदार, खासदार आणि मंत्री येऊन गेले आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात 60 टक्के ओबीसींच्या हितासाठी चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

  • 27 Jun 2024 08:49 AM (IST)

     सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी

    सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज मुंबई हायकोर्टात 11 वाजता महत्वाची सुनावणी होणार आहे. सरकार आज कोर्टापुढे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. सगोसोयरेच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी आव्हान दिलं असून त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

  • 27 Jun 2024 08:41 AM (IST)

    पुण्यानंतर आता ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये होणार बुलडोझर कारवाई

    पुणे शहरानंतर आता ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये मध्येही बुलडोझरने कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे, आणि मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवला जाणार आहे. शहराला अंमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

  • 27 Jun 2024 08:26 AM (IST)

    T20 world cup 2024 : दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक,अफगाणिस्तान पराभूत

    दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवून टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान संघ 9 विकेट्सने पराभूत झाला आहे.

  • 27 Jun 2024 08:24 AM (IST)

    रेल्वेमधुन प्रवास करताना होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या आकडेवारीबाबत हायकोर्टाकडून चिंता व्यक्त

    रेल्वेमधुन प्रवास करताना होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या आकडेवारीबाबत हायकोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  रेल्वेमधून गाईगुरांसारखी प्रवाशांची वाहतूक होते, हे गंभीर आहे असे हायकोर्टाने म्हटले आहे.  याप्रकरणी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला हायकोर्टाकडून सूचना देण्यात आल्यात. रेल्वेतील वाढते मृत्यूचे आकडे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरू अस हायकोर्टाने म्हटलं आहे.

  • 27 Jun 2024 08:21 AM (IST)

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून होणार सुरूवात

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार. पुणे कार अपघात प्रकरण, तसेच पुणे ड्रग्स प्रकरणाचे मुद्दे या अधिवेशनात गाजणार. सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Published On - Jun 27,2024 8:20 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.