Maharashtra Assembly Adhiveshan LIVE : धन्यवाद मोदी नंतर धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम, मुंबईकरांच्या उर्वरित प्रश्नांची अपेक्षापूर्ती होणार

| Updated on: Feb 21, 2024 | 7:06 AM

Maharashtra Assembly Adhiveshan on Maratha Aarakshan LIVE : शिंदे सरकारने आजपासून विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या आरक्षणासंदर्भातील महत्वाच्या घडामोडी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहे. आजच्या सर्व महत्वाच्या घडमोडी, वाचा सविस्तर....

Maharashtra Assembly Adhiveshan LIVE : धन्यवाद मोदी नंतर धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम, मुंबईकरांच्या उर्वरित प्रश्नांची अपेक्षापूर्ती होणार

मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाचा प्रश्न मागच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार मराठा आरक्षणाची मागणी केली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या तीव्र आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनातील घडामोडींकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर मराठा आरक्षणासंदरर्भात आज या विशेष अधिवेशनात कायदा होणार आहे. 10 ते 13 टक्क्यांच्या दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं विशेष अधिवेशन या संदर्भातल्या महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2024 07:52 PM (IST)

    ‘पुन्हा पुन्हा असं तुम्हीच बोलता ना… तीच संधी पुन्हा मुंबई तुम्हाला देईल’, मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

    मुंबई | “सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल मी आणि सरदेसाई का आले? मला प्रवीण दरेकरांनी फोन केला होता. कोण कोणाला काय बोलतो ते कळत नाही, कोण कोणाला कधी टाळी देतं हे देखील कळत नाही. सीडीमध्ये विकास करा म्हंटल्यावर मला धडकी भरली… सीडी, ईडी बोलल्यावर धडकी भरते हो. चांगलं काम करणारं सरकार राज्यात असणं आवश्यक आहे आणि आपण उत्तम काम करतायत. पुन्हा पुन्हा असं तुम्हीच बोलता ना… तीच संधी पुन्हा मुंबई तुम्हाला देईल”, असं मोठं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं. भाजपच्या धन्यवाद देवेंद्र या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 20 Feb 2024 06:42 PM (IST)

    भगतसिंग मैदान येथे ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन

    मुंबई | गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी केलेल्या घोषणांची वचनपूर्ती केल्याबद्धल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री यांची काळाचौकी अभ्यूदय नगर मधील शहीद भगतसिंग मैदान येथे ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपचे अनेक नेते मंडळी दाखल झाले आहेत.

  • 20 Feb 2024 06:15 PM (IST)

    मी मरणाला घाबरत नाही : छगन भुजबळ

    पुणे | मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू आहे, मोबाईल बघतो. आज सर्वांना कळालं पाहिजे हा जरांगे काय आहे ते,असं भुजबळ म्हणाले.

    भुजबळ यांच्या भाषणातील मुद्दे

    – माझ्यावर कुणीही हल्ला केला तरी या जरांगेला आत घेतलं पाहिजे.

    – फडणवीसांचे पोलीस काय करत आहेत.

    – मी मरणाला घाबरत नाही.

    – माझ्याबद्दल घाण गाणी तयार केली जातात, रात्री उशिरापर्यंत डिजे लावला जातो.

    – जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ते ओबीसी समाजातल्या मुलांना मिळालं पाहिजे.

    – आज सर्वांना कळाल पाहिजे हा जरांगे काय आहे ते, कायदेशीर कारवाई तर करणारच.

    – माझ्यावर कुणीही हल्ला केला तरी या जरांगेला आत घेतलं पाहिजे.

    – फडणवीसांचे पोलीस काय करत आहेत.

    – मी मरणाला घाबरत नाही.

    – माझ्याबद्दल घाण गाणी तयार केली जातात, रात्री उशिरापर्यंत डिजे लावला जातो.

    – जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ते ओबीसी समाजातल्या मुलांना मिळालं पाहिजे.

  • 20 Feb 2024 05:52 PM (IST)

    चंदीगड महापौर निवडणूक: पुन्हा होणार मतमोजणी

    चंदीगड महापौर निवडणुकीवर CJI म्हणाले की मतमोजणी पुन्हा केली जाईल. रद्द झालेली 8 मते वैध असतील.

  • 20 Feb 2024 05:35 PM (IST)

    ‘आप’ आणि काँग्रेसची आज बैठक, जागावाटपावर चर्चा

    आज संध्याकाळी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टीला दिल्लीतील लोकसभेच्या 7 पैकी फक्त 1 जागा काँग्रेसला द्यायची आहे. ‘आप’चे म्हणणे आहे की काँग्रेसची मते सातत्याने कमी होत आहेत, त्यामुळे त्यांना दिल्लीत जास्त जागा देता येणार नाहीत.

  • 20 Feb 2024 05:25 PM (IST)

    बिहारमधील सर्व 6 राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध विजयी

    बिहारमधील सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. बिहारमधून राज्यसभेसाठी भाजपचे दोन, आरजेडीचे दोन, जेडीयूचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार रिंगणात होता. सर्वांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून भीम सिंह आणि धरमशीला गुप्ता यांनी अर्ज दाखल केला होता, तर जेडीयूकडून संजय झा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रीय जनता दलाकडून मनोज झा आणि संजय यादव आणि काँग्रेसकडून अखिलेश प्रसाद सिंह यांनी उमेदवारी दाखल केली होती.

  • 20 Feb 2024 05:13 PM (IST)

    सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार

    राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी तिन्ही जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चुन्नीलाल गरसिया आणि मदार राठोड यांना राज्यसभेचे उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राजस्थान विधानसभेचे प्रधान सचिव आणि राज्यसभेचे रिटर्निंग ऑफिसर महावीर प्रसाद शर्मा यांनी दिली.

  • 20 Feb 2024 04:59 PM (IST)

    शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे धरणे आंदोलन

    ठाणे : पंजाब, हरयाणा येथील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे -पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

  • 20 Feb 2024 04:54 PM (IST)

    कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम, वाणिज्य मंत्रालयाची माहिती

    नवी दिल्ली : कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम रहाणार अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार यांनी दिली. गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेला वाणिज्य विभागाच्या सचिवांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

  • 20 Feb 2024 04:46 PM (IST)

    मराठा आरक्षण टिकलं की नाही यात शंका – पृथ्वीराज चव्हाण

    मुंबई : मराठा आरक्षण टिकलं की नाही यात शंका आहे. देवेद्र फडणवीसांनी 2018 मध्ये आऱक्षण दिलं. ते सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. क्युरेटीव्ह पिटीशन सुप्रिम कोर्टातील निरसत झालेली आहे. महाविकास आघाडी जागा वाटपावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

  • 20 Feb 2024 04:36 PM (IST)

    टिकणारे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जल्लोष नाही, सकल मराठा संघाची भूमिका

    ठाणे : आरक्षणाबाबत ठाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. परंतु, जोपर्यंत टिकणारे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जल्लोष साजरा करणार नाही अशी भूमिकाही मराठा समन्वयक रमेश आंब्रे यांनी घेतली आहे. ज्यांना कुणबीमधून आरक्षण घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे. मात्र, आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळावे असेही ते म्हणाले.

  • 20 Feb 2024 04:18 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी मानले मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार, म्हणाले शांतपणे हा विषय…

    मुंबई : ज्या निर्घृणपणे निर्दयीपणाने डोकी फोडली ती आवश्यकता नव्हती. शांतपणे हा विषय सोडवता आला असता. मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिले. मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं असा टोला उद्धव ठकारे यांनी लगावला.

  • 20 Feb 2024 04:10 PM (IST)

    मनोज जरांगे यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार – गोपीचंद पडळकर

    मुंबई : जी गोष्ट होणार नाही त्यासाठी अट्टहास कशासाठी धरायचा. मी सगळ्या ओबीसी बांधवांचे आभार मानतो की त्यांनी एकजूट दाखवली. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एकत्रित आले. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नव्हता. कोणाचेही आरक्षण काढून न घेता आज सरकारने आरक्षण दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. मनोज जरांगे यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

  • 20 Feb 2024 03:45 PM (IST)

    मराठा समाजाला फसवायचं आणि ओबीसीला घाबरवायचं हे काम सरकार करत आहे- आव्हाड

    मराठा समाजाला फसवायचं आणि ओबीसीला घाबरवायचं हेच सरकार करत आहे. कायद्याच्या कक्षेत हे आरक्षण टिकावं ही आमची आपेक्षा आहे. पण कोणालाही न बोलू देण हे लोकशाही विरोधात ही हत्या.काहीच बबोलू दिले नाही, चर्चेशिवाय पारित म्हणजे काहीतरी लफड आहे,असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

  • 20 Feb 2024 03:30 PM (IST)

    100% आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल- चंद्रकांत बावनकुळे

    आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. विरोधकांनी एक माताने हा निर्णय पारित केला आहे. सरकारने पूर्ण काळजी घेतली आहे. 100% आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल. मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण कायद्याने मिळालं आहे. येणाऱ्या पिढीला फायदा होणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

  • 20 Feb 2024 03:15 PM (IST)

    आमदार गणपत गायकवाडांच्या चुलत भावाच्या कार्यालयाची तोडफोड चार आरोपींना अटक

    कल्याण आमदार गणपत गायकवाड यांच्या चुलत भावाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या चार आरोपीना कोळसेवाडी पोलिसांच्या बेड्या  ठोकल्या  आहेत. कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अनोळखी इसम चावी लावल्याच्या वादातून दारूच्या नशेत कृत्य केल्याचे आरोप केला गेला आहे.

  • 20 Feb 2024 11:57 AM (IST)

    assembly session 2024 | आरक्षण मसुद्याला तायवाडे यांचे समर्थन

    मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यावर ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी समाधान व्यक्त केले. १० टक्के आरक्षणाच्या शिफारशीला आमचे समर्थन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 20 Feb 2024 11:42 AM (IST)

    बारावीसंदर्भात परीक्षा मंडळाची महत्वाची घोषणा होणार

    पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आज पत्रकार परिषद होत आहे. यामध्ये बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी पत्रकार परिषद घेणार आहे.

  • 20 Feb 2024 11:34 AM (IST)

    assembly session 2024 | मनोज जरांगे यांची नाराजी दूर होणार

    मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी समाधान व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याचीही सरकार दखल घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरक्षण लागू झालं आणि कोर्टात टिकलं तर मनोज जरांगे यांची नाराजी दूर होणार आहे.

  • 20 Feb 2024 11:21 AM (IST)

    assembly session 2024 | आरक्षणाचा मसुदा विधिमंडळात

    मराठा आरक्षणासंदर्भातील मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्यानंतर हा मसुदा आता विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. दोन्ही सभागृहात या मसुद्यावर चर्चा होणार आहे.

  • 20 Feb 2024 11:10 AM (IST)

    assembly session 2024 | राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात

    राज्यपाल रमेश बैस यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अभिभाषणातून राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. राज्य सरकारच्या विविध योजना त्यांना मांडल्या. यावेळी सर्वसामान्यांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली.

  • 20 Feb 2024 11:00 AM (IST)

    ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको

    मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्यासाठी आमचाही विरोध नाही, पण ते करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी सर्वांची मागणी असल्याचे ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेडगे यांनी केली.

  • 20 Feb 2024 10:52 AM (IST)

    विशेष अधिवेशनापूर्वीच चर्चेचा फड

    विशेष अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एक छोटेखानी बैठक झाली तर विरोधी पक्ष, काँग्रेसेच्या पदाधिकाऱ्यांची पण बैठक सुरु आहे.

  • 20 Feb 2024 10:45 AM (IST)

    मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या

    मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे, असा ठाम निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला. सगे सोयऱ्याची अधिसूचना सरकारने काढली. त्यामुळे आता ज्या जमिनीचा सात-बारा नाही, ती जमीन आम्ही कशी घेणार,असा सवाल त्यांनी केला.

  • 20 Feb 2024 10:36 AM (IST)

    ही तर सरकारकडून फसवणूक

    जर सगे-सोयऱ्याची अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी होणार नसेल, तर मग अधिसूचना काढलीच कशाला, असा खडा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकार गोड बोलून मराठा समाजाची दिशाभूलच नाही तर फसवणूक करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

  • 20 Feb 2024 10:20 AM (IST)

    मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण

    राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेटने मंजूरी दिली. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या 10 टक्के आरक्षणाची माहिती मसुद्यात देण्यात आली आहे.

  • 20 Feb 2024 10:12 AM (IST)

    सगे-सोयऱ्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन

    सगे-सोयऱ्याच प्रश्न आजच्या विशेष अधिवेशनात मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांनी इतके दिवस मागणी केली. आंदोलनं केली, पण सरकार दोन तीन लोकांच्या सांगण्यावरुन वेगळं आरक्षण लादत असल्याचा आरोप त्यांनी केला. सगे-सोयऱ्याची अधिसूचना काढण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.

  • 20 Feb 2024 10:04 AM (IST)

    जे मागत नाही, ते आरक्षण थोपवत आहे

    ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. पण विशेष अधिवेशनात, जे मागत नाही, ते आरक्षण सरकार थोपवत आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

  • 20 Feb 2024 10:03 AM (IST)

    मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने मिटावा-संजय राऊत

    मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने मिटावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे. विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये असे ते म्हणाले.

  • 20 Feb 2024 09:49 AM (IST)

    विरोधी भुमिका घेतल्यास ओबीसी पेटून उठेल- तायवाडे

    विरोधी भुमिका घेतल्यास ओबीसी पेटून उठेल अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनावर ते बोलत होते.

  • 20 Feb 2024 09:38 AM (IST)

    विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं- संजय राऊत

    मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेलं विशेष आरक्षण निर्णायक ठरावं, तसेच कोणाच्याही ताटातलं काढून मराठ्यांना आरक्षण नको असंही संजय राऊत म्हणाले.

  • 20 Feb 2024 09:34 AM (IST)

    मराठा समाजाला 10 ते 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता

    आज मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मराठा समाजाला 10 ते 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.

  • 20 Feb 2024 09:27 AM (IST)

    वेगळ मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश- छगन भुजबळ

    वेगळ मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश आहे. ओबीसीमधुन मराठा आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीवर छगन भुजबळ म्हणाले.

  • 20 Feb 2024 09:25 AM (IST)

    सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत साडेसहा लाख हरकती- छगन भुजबळ

    आज मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन होणार आहे. सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत साडेसहा लाख हरकती आल्याची माहिती मंत्री छगण भुजबळ यांनी सांगितले.

  • 20 Feb 2024 08:57 AM (IST)

    Live Update | बार्शीतील मराठा आंदोलकाची तब्येत ढसाळली

    बार्शीतील मराठा आंदोलकाची तब्येत ढसाळली… मराठा आंदोलक आनंद काशिद यांचे मागील दहा दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे. मात्र काशीद यांची प्रकृती काल ढसाळल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले. मात्र सलाईन लावले असले तरी आंदोलन स्थळीच त्यांच्यावर उपचार चालू आहेत… जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे तोवर माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका उपोषणकर्ते आंनद काशिद यांनी घेतलीय.

  • 20 Feb 2024 08:45 AM (IST)

    Live Update : ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण ही मागणी लावून धरावी – जरांगे पाटील

    सगे सोयरे अंमलबजावणी आधी करावी… मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं… ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी करावी… सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा… ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण ही मागणी लावून धरावी… असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  • 20 Feb 2024 08:34 AM (IST)

    Live Update : मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनात कायदा होणार

    मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनात कायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसींना धक्का लागता आरक्षण देणार… असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

  • 20 Feb 2024 07:57 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचं सरकारला काय आवाहन?

    तुम्ही शब्द देताय पण अंमलबजावणी करत नाहीत. तुम्ही अंमलबजावणी केली तर लोक खुश होतील. मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, असं आम्ही कधीच म्हणलो नाहीत. फक्त त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 20 Feb 2024 07:50 AM (IST)

    आमदार रईस शेख यांची मुस्लिम आरक्षणाची मागणी

    मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनाआधी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण विषयी निर्णय होत नसताना आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे.  राज्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या 11.5 टक्के आहे. सच्चर आयोग आणि रंगनाथ मिश्रा समिति ने मुस्लिम समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण मान्य केलं आहे. त्याआधारे आरक्षण दिल्यास मुस्लिम समाजातील 50 उपजातीमधील जनतेला याचा फायदा होईल, असं आमदार रईस शेख यांनी नमूद केलं आहे.

  • 20 Feb 2024 07:45 AM (IST)

    मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद

    सगे सोयरे अंमलबजावणी आधी करावी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती. त्याची अंमलबजावणी करावी, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

  • 20 Feb 2024 07:35 AM (IST)

    विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची बैठक

    विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची बैठक होत आहे.  ९ .३० वाजता विधानभवनात बैठक होणार आहे.  काँग्रेस आमदारांना दिल्या सूचना जाणार आहेत. आज मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडून बाजू मांडण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं जाणार  आहे.

Published On - Feb 20,2024 7:31 AM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.