Maharashtra Breaking News LIVE updates : गुरुवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

| Updated on: Dec 14, 2023 | 7:02 AM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 13 डिसेंबर... विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. अशात या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE updates : गुरुवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : आज 13 डिसेंबर… विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे. अनेक मोर्चे विधिमंडळावर धडकत आहेत. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्याचसोबतच इतरही महत्वाच्या बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. राज्यभरातील रुग्णालयांच्या परिचारिका 14 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. तर पुण्यात उत्पादन शुल्क विभागाचा हॉटेल आणि पबला दणका दिलाय. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Dec 2023 07:55 PM (IST)

    गुजरातमध्ये कार खड्ड्यात पडली, चौघांचा मृत्यू

    गुजरातच्या पाटण जिल्ह्यात रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकराला धडकल्यानंतर कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. त्यात एक जोडपे आणि त्यांची अल्पवयीन मुलगी आणि भाची यांचा बुडून मृत्यू झाला. पाटण येथील सांतालपूर तालुक्यातील फांगली गावाजवळ सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.

  • 13 Dec 2023 07:40 PM (IST)

    सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा गंभीर, गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे – खरगे

    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज संसदेतील सुरक्षेतील त्रुटी अत्यंत गंभीर आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात येऊन यावर उत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.

  • 13 Dec 2023 07:35 PM (IST)

    मध्यप्रदेशातील धार्मिक स्थळांवर लाऊड ​​स्पीकरवर बंदी

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोहन यादव यांचा पहिला आणि सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारने धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी जास्त आवाज आणि अनियंत्रित लाऊडस्पीकरवर बंदी घातली आहे.

  • 13 Dec 2023 07:25 PM (IST)

    संसद भवन प्रकरण: पाचही आरोपी गुरुग्राममधील या व्यक्तीच्या घरी थांबले

    आज संसद भवनाच्या आत दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. यातील एक तरुण एका बेंचवरून धावू लागला तर दुसऱ्याने त्याच्या बुटातून काहीतरी काढून फवारणी केली. इतकेच नाही तर दोन जणांनी संसदेबाहेर रंगीत धुराचा गॅस फवारला. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. संसदेच्या आत आणि बाहेर पकडलेले चार आरोपी गुरुग्राममधील ललित झा नावाच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 13 Dec 2023 07:08 PM (IST)

    अभिनेता साहिल खानला धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

    महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मोठा झटका बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. माटुंगा येथे एफआयआर दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करून 15 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती.

  • 13 Dec 2023 06:19 PM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

    पुणे | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी ७९/००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून 14 डिसेंबर रोजी हे काम केलं जाणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई मार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.

  • 13 Dec 2023 06:10 PM (IST)

    राज्यातील सरकारी रुग्णालये ‘व्हेंटिलेटर’वर

    नागपूर | राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे. तसेच रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर आहेत. याकडे आरोग्य विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल आणि मृत्यू होत असल्याचं आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना खडसावलंय. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वर्षा गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला.

    राज्य सरकारच्या बजेटमधून किती टक्के आरोग्य विभागावर खर्च केला जातो? बुलढाण्यात झालेल्या गरोदर महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना निर्दोष का ठरवण्यात आलं? आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात किती समन्वय आहे? असे प्रश्न यावेळेस वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समोर उपस्थित केले.

  • 13 Dec 2023 05:55 PM (IST)

    अजित पवार यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे महत्त्वाचे, भास्कर जाधव यांची टीका

    नागपूर : राज्यामध्ये शांतता नांदेल असा निर्णय करावा अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे अजित पवार काय म्हणाले यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांना पत्र दिलं. ते पत्र व्हायरल केलं. त्याचबरोबर अजित दादांनी इतके दिवसांनी खुलासा केला. याचा अर्थ त्यांची कुठे तरी अगोदर चर्चा झालेली होती ही नक्की आहे. म्हणूनच नवाब मलिक त्यांच्या बाजूला जाऊन बसले अशी टीका शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली.

  • 13 Dec 2023 05:45 PM (IST)

    मॉरिशस येथे महाराष्ट्र सदन उभे राहणार, 8 कोटींचा निधी सुपूर्द

    नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मॉरिशस दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तेथील महाराष्ट्र भवनसाठी 8 कोटी रुपये घोषित केले होते. त्या रकमेचा धनादेश मॉरिशसचे केंद्रीय मंत्री ॲलन गानू यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

  • 13 Dec 2023 05:40 PM (IST)

    संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना या खासदाराच्या शिफारशीने मिळाले होते पास

    नवी दिल्ली : संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीने पास मिळाले होते अशी माहिती समोर आली आहे. प्रताप सिम्हा हे यापूर्वी पत्रकार होते. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे ते सदस्यही होते. प्रताप सिम्हा हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. भाजयुमोचे ते अध्यक्ष आहेत.

  • 13 Dec 2023 05:35 PM (IST)

    कोर्टाच्या निकालाने भाजपचा हुकूमशाहीचा चेहरा उघड झाला, मोहन जोशी यांची टीका

    पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग किंवा इतर संस्थांचा भाजपने हुकूमशाही पद्धतीने वापर केला त्याला कोर्टाने आज चपराक दिली अशी टीका काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी केलीय. कोर्टाच्या आजच्या निकालाने भाजपचा हुकूमशाहीचा चेहरा उघड झाला आहे असेही ते म्हणाले.

  • 13 Dec 2023 05:30 PM (IST)

    धनगर आरक्षणकर्त्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

    हिंगोली : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले कार्यकर्ते अशोक मस्के यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. सरकार तुमच्या पाठीशी आहे. उपोषण करून जीवाला त्रास करून घेऊ नका असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. धनगर समाजाला अनुसुचित जमाती (एसटी)प्रवर्गाच्या आरक्षणात समाविष्ट करावे या मागणीसाठी मस्के यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

  • 13 Dec 2023 05:20 PM (IST)

    राज्यातील मंत्री सुरक्षित नाही, सामान्य जनतेचे काय? नाना पटोले यांची टीका

    नागपूर : सदावर्ते यांची सरकारमध्ये श्रद्धेय लोक बसली आहेत. ज्या पद्धतीने मराठा आरक्षण विषय असो की अनेक विषय असो, ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सिद्द आहे. त्यांना राजकीय पाठबळ आहे. सरकारची मस्ती आहे हे वरिष्ठ मंत्र्यांच्या भावनेतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांचे आउटपुट हे सभागृहात दाखवले. राज्यातील मंत्री सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय हाल असतील हे भुजबळ यांच्या वक्तव्याने स्पष्ट होत अशी टीका नाना पटोले यांनी केली.

  • 13 Dec 2023 05:10 PM (IST)

    ठाण्यात दीपक केसरकर यांचा पुतळा जाळून केला निषेध

    ठाणे : मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या संतापजनक उद्गागारासंदर्भात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठलेही तत्त्व पाळले नाही. बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेब यांनी निवडणूक आयोगाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाही असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी उलट तपासणीमध्ये केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध ठाकरे गटाकडून करण्यात आला.

  • 13 Dec 2023 05:06 PM (IST)

    मुख्यमंत्री यांचे आश्वासन, माथाडी कामगारांचा बंद मागे

    नागपूर : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विधेयकाबद्दल आम्हाला आश्वासन दिले आहे. यामुळे 14 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सबंध माथाडी कामगार चळवळीचा बंद पुकारला होता तो माघारी घेत आहोत अशी घोषणा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बेकायदेशीर फेक माथाडीबद्दल आम्ही लेखी सूचना दिल्या आहेत, त्यासाठी समिती गठन केलेली आहे. त्या समितीमध्येही आम्हाला सूचना देण्याकरिता त्यांनी मुभा दिली आहे असे त्यांनी सांगितले.

  • 13 Dec 2023 04:35 PM (IST)

    लोकसभा प्रकरण : संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल – भागवत कराड

    नवी दिल्ली : १ वाजताच्या आसपास ही घटना घडली. त्यावेळी लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. सरकारकडून चौकशी सुरु आहे. ते कोण होते, त्यांचा हेतू काय होता हे चौकशीतून समोर येईल. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

  • 13 Dec 2023 04:20 PM (IST)

    सारथीला जे दिले ते महाज्योतीला द्या – छगन भुजबळ

    हिवाळी अधिवेशन : राज्यात अशांततेच वातावरण कोणी तयार केले. आम्हाला सर्वांना शिव्या देण्यात आल्या. आरक्षणावरुन मला टार्गेट करण्यात आले. मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या – भुजबळ

  • 13 Dec 2023 04:17 PM (IST)

    सरकारी नोकरीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण द्या – छगन भुजबळ

    हिवाळी अधिवेशन : सरकारी नोकरीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. राज्यात वंचितांसाठी योजना राबवताना भेदभाव – छगन भुजबळ

  • 13 Dec 2023 03:50 PM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राच्या पथकाची पाहणी

    नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राच्या पथकाने पाहणी केली आहे. केंद्रीय पथकात आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेतलाय. दुष्काळी मदत लवकर मिळण्याची शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली. नंदुरबार तालुक्यातील बलदाने, आसाने, घोटाणे तसेच रनाळा या परिसरात पथकाचा पाहणी दौरा केला.

  • 13 Dec 2023 03:40 PM (IST)

    संजय राऊत काय बोलतात त्याला आम्ही महत्व देत नाही- भरत गोगोवले

    संजय राऊत काय बोलतात त्याला आम्ही महत्व देत नाही, त्याला काडीची काही माहिती नाही. मी स्वतःची तुलना छत्रपतींशी केली नाही. मी माझी भूमिका मांडली मी मावळा आहे. 4 जूला मी सगळ्यांना वाॅट्सऐपने व्हिप बजावला होता. जेवढे आमचे आमदार आहेत त्यांना माझ्या मोबाईल फोनने व्हिप बजावला असल्याचं  भरत गोगोवले यांनी म्हटलं आहे.

  • 13 Dec 2023 03:30 PM (IST)

    संसदेमधल्या गोंधळानंतर ओम बिर्ला यांचं सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीचे निमंत्रण

    संसदेमधल्या घटनेनंतर महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. संध्याकाळी चार वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिलं असून आहे. आज झालेली घटना आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 13 Dec 2023 03:20 PM (IST)

    एलटीटी स्थानकाच्या बुकिंग आणि वेटींग हॉलमध्ये भाषण आग

    एलटीटी स्थानकाच्या (लोकमान्य टर्मिनल स्थानक) बुकिंग आणि वेटींग हॉलमध्ये आग लागली आहे. अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

  • 13 Dec 2023 03:10 PM (IST)

    संसद भवनात उडी घेणाऱ्या अमोल शिंदे पत्ता मिळाला

    संसद भवनात उडी घेणारा अमोल धनराज शिंदे हा लातुर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी-नवकुंड येथील रहिवाशी असल्याची माहिती असून तो काही दिवसांपासून गाव सोडून इतर ठिकाणी राहत होता, त्याचे आई वडील मजुरी करतात, तर तो गावात राहून सैन्य भरतीची तयारी करीत होता. घरी सांगून तो दिल्लीला गेला होता. आता पुढील तपास लातुर पोलीस करीत आहेत.

  • 13 Dec 2023 02:58 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा कहर

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५ हजार ८०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १५ तालुक्यांमधील एकूण २६३ गावांमध्ये १३ हजार ४७१ शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कापूस, केळी , तूर, आणि कांदा या पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू , हरभरा, मका या पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. संपूर्ण नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवला आहे.

  • 13 Dec 2023 02:50 PM (IST)

    पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

    जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती गेल्या सहा महिन्यांतील निच्चांकावर आल्या आहेत. किंमतीतील ही घसरण पेट्रोलियम कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. अमेरिकन तेल 70 डॉलरपेक्षा कमी तर आखाती देशातील कच्चे तेल 73 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. या किंमतीत घसरणीचा अंदाज आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई येऊ शकते.

  • 13 Dec 2023 02:45 PM (IST)

    अमोल शिंदे लातूरमधील झरी गावचा रहिवाशी

    अवघ्या भारताला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. संसदेचं अधिवेशन सुरु असताना दोन व्यक्तींनी संसद परिसरात गोंधळ घातला. या दोघांनी आधी संसदेबाहेर फटाके फोडले. त्यानंतर दोघेही लोकसभेत गेले. तिथे त्यांनी व्यक्ती लोकसभेत जात गोंधळ घातला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. संसदेतील या गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. संसदेत शिरणारा महाराष्ट्रातील आहे. संसदेत गोंधळ घालणारी व्यक्ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे, अशी माहिती समोर आली आहे. तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.

  • 13 Dec 2023 02:41 PM (IST)

    घटनेची चौकशी करण्याचे लोकसभा अध्यक्षांचे आश्वासन

    आज नवीन संसदेत तरुणांनी धुडगूस घातला.  संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या. त्यांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅडलचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामकाज सुरु असतानाच या तरुणांनी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घातला. ही सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे समोर येत आहे. आता प्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मत मांडले.

  • 13 Dec 2023 02:40 PM (IST)

    या आयपीओमुळे झाली मोठी कमाई

    वर्ष 2023 आता संपत आले आहे. बाजारात गेल्या काही दिवसांत मोठी उलाढाल झाली. अनेक उच्चांक बाजाराने गाठले. या वर्षात इनिशिअल पब्लिक ऑफरिंगने बाजारात चांगली कमाई करुन दिली. त्यातील काही आयपीओंनी या 2023 वर्षांत मोठी कमाई करुन दिली. गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला. काहींना तर छप्परफाड कमाई करता आली. यामध्ये डीएलएम, टाटा टेक्नॉलॉजीज, सॅन्को गोल्डसह इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी टॉप 10 मध्ये जागा मिळवली. त्यातील 5 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले. त्यांच्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरली.

  • 13 Dec 2023 02:10 PM (IST)

    मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा

    सोलापुरातील वैराग मध्ये मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा काढला. ड्रोनच्या माध्यमातून ट्रॅक्टर मोर्चाची काही क्षण चित्र पण टिपण्यात आली. बार्शी तालुक्यातील वैराग पांचक्रोशीतील 500 पेक्षा अधिक ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी वैरागमधील साखळी उपोषणाला पाठींबा आणि वैराग ते मुंबई ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

  • 13 Dec 2023 02:02 PM (IST)

    आधार कार्डविषयी आली मोठी अपडेट

    आधार कार्डविषयी एक अपडेट समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड हे आजही भारतीयांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे. अनेक ठिकाणी या कार्डचा उपयोग होतो. या संबंधीचे काम नागरिकांना 14 मार्चपर्यंत करता येईल.केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी, हे कार्ड अपडेट करण्यासाठी निशुल्क सेवा सुरु केली होती. आधार कार्ड हे आजही भारतीयांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे.

  • 13 Dec 2023 02:01 PM (IST)

    संसदेत अज्ञात व्यक्तींचा शिरकाव,दोघे जण ताब्यात

    संसदेत अधिवेशन सुरु असताना अज्ञात व्यक्तींनी शिरकाव केल्याचे उघडकीस आले आहे. अमोल शिंदे, नीलम नावाची महिला यांना ताब्यात घेतले आहे.

  • 13 Dec 2023 02:00 PM (IST)

    चार तरुणांचा संसदेत गोंधळ

    देशभरात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर तीन जण प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे तिघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना तीन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली.

  • 13 Dec 2023 12:57 PM (IST)

    मध्य रेल्वेतील बदलापूर स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

    मध्य रेल्वेतील बदलापूर स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला आहे. जागा मिळत नसल्याने कारशेडमधून ट्रेनमध्ये बसत ट्रेनचे दरवाजे आतून केले बंद. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनचे दरवाजे न उघडल्याने संतप्त प्रवाश्यांनी स्टेशनवर घातला गोंधळ.

  • 13 Dec 2023 12:37 PM (IST)

    केंद्रीय पथक नाशिक जिल्हा दुष्काळ जाहीर झालेल्या गावांच्या पाहणी दौऱ्यावर

    केंद्रीय पथक नाशिक जिल्हा दुष्काळ जाहीर झालेल्या गावांच्या पाहणी दौऱ्यावर आहे. मालेगाव तालुक्यातील सौंदाणे ग्रामपालिका येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद. दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पाऊस, गारपिटीचा घेतला आढावा.

  • 13 Dec 2023 12:30 PM (IST)

    रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांचा आरक्षण कोटा पुन्हा सुरू करावा- खासदार सुप्रिया सुळे

    रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांचा आरक्षण कोटा पुन्हा सुरू करावा. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी. महिलांना मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी. कोरोना काळानंतर रेल्वेच्या अनेक सवलती बंद झाल्या असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले आहे.

  • 13 Dec 2023 12:21 PM (IST)

    संस्कृती आणि शिक्षणाच्या राजधानीत आता ‘नाईटलाईफ’ची हवा

    पुण्यातील नळ स्टॉप चौकात सर्रास सुरू आहेत रात्री 1 ते सकाळी 5 पर्यंत फूड स्टॉल. रात्री बेरात्री सुरू असलेल्या या हॉटेल, फूड स्टॉलवर पोलिसांचे दुर्लक्ष दिसत आहे. कोथरूड पोलीस ठाणे, डेक्कन पोलीस ठाणे आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे ५ पर्यंत हॉटेल्स सुरू.

  • 13 Dec 2023 12:13 PM (IST)

    जम्मू काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी घेतली शरद पवार यांची भेट

    जम्मू काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी या दोघांची भेट झाली आहे. सकाळी या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

  • 13 Dec 2023 12:03 PM (IST)

    प्रविण दरेकर यांनी केली आहे संजय राऊत यांच्यावर टीका

    संजय राऊत कुणाचे गुलाम हे महाराष्ट्राला माहिती आहे. चाकरी करायची मातोश्रीची आणि गुलामगिरी करायची कुणाची हे सगळ्यांना माहित आहे, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 13 Dec 2023 11:59 AM (IST)

    आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ कारभार सुरू, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- विजय वडेट्टीवार

    बुलढाण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. “सरकार टेंडरमध्ये अडकलंय. आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ कारभार सुरू आहे. आरोग्यमंत्री गंभीर नाहीत, त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. विधानसभेतून विरोधी पक्षांनी सभात्याग केला आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणाती दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 13 Dec 2023 11:50 AM (IST)

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राजधानी दिल्लीत येत्या 22 आणि 23 डिसेंबरला ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्री सहभागी होणार आहेत. भारत संकल्प अभियान, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी रूपरेखा, पाच राज्यातील निवडणुकांचा आढावा, तालुका आणि जिल्हास्तरीय बूथ याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दोन दिवस ही बैठक होणार आहे.

  • 13 Dec 2023 11:40 AM (IST)

    आरोग्य विभागाच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक आक्रमक

    आरोग्य विभागाच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी सभात्याग केला आहे.

  • 13 Dec 2023 11:30 AM (IST)

    राम मंदिराच्या उद्घाटनाला शिंदे गटाचे सगळे आमदार-खासदार

    राम मंदिराच्या उद्घाटनाला शिवसेना शिंदे गटाचे सगळे आमदार आणि खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत. सगळ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारसंघातून कार्यकर्ते नेण्याचंही नियोजन सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे.

  • 13 Dec 2023 11:20 AM (IST)

    अजित पवार यांच्याविरोधात शिवाजी विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक विद्यार्थी आक्रमक

    कोल्हापूर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवाजी विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पीएचडी अभ्यासक विद्यार्थ्यांचं अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर घोषणाबाजी करत त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. सारथी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी पीएचडी करून दिवे लावणार आहेत का असं वक्तव्य केलं होतं.

  • 13 Dec 2023 11:10 AM (IST)

    नवी दिल्ली – महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक

    नवी दिल्ली – महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. राज्यातील जागावाटपबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नागपुरात ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला समन्वय समितीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

  • 13 Dec 2023 10:54 AM (IST)

    Maharashtra News : धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत- संजय राऊत

    धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत असं संजय राऊत म्हणाले. आमचे सगळे उमेदवार हे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणून लढतील असं शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 13 Dec 2023 10:44 AM (IST)

    Maharashtra News : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्वे

    आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्वे करण्यात आला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. निशानी नसताना महायुतीनं 2300 ग्रामपंचायती जिंकल्या असंही सामंत म्हणाले.

  • 13 Dec 2023 10:37 AM (IST)

    Maharashtra News : आम्ही कधी कोणाशी गद्दारी केली नाही- रोहित पवार

    आम्ही कधी कोणाशी गद्दारी केली नाही आम्ही पवार साबेसांसोवतच आहोत. असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या असा अशी टिका राम कदम यांनी केली होती. यावर जे लोकं लोकांमध्येच नाहीत त्यांच्यावर काय बोलणार असं रोहित पवार म्हणाले.

  • 13 Dec 2023 10:25 AM (IST)

    Maharashtra News : ठाकरे गटाचा अदानींविरोधात मोर्चा, पोलिसांना अर्ज

    16 तारखेला अदानी समुहाच्या बीकेसीतील कार्यालयावर ठाकरे गटाचा अदानी विरोधात मोर्चा निघणार आहे. यासाठी ठाकरे गटाने पोलिसांना अर्ज केला आहे. धारावी पुनःविकास प्रकल्पाला ठाकरे गटाने तिव्र विरोध केला आहे.

  • 13 Dec 2023 10:18 AM (IST)

    Maharashtra News : कोल्हपूरची पंचगंगा पून्हा दूषीत

    कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत शेकडो सांडपाण्याचं पाणी सोडल्या जात असल्याने नदीची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. नदीच्या पाण्यात कचरा आणि प्लास्टिकचं साम्राज्य आहे. यामुळे नदीकाठच्या गावाच्या लोकंचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  • 13 Dec 2023 10:12 AM (IST)

    Maharashtra News : कोस्टर रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार

    साडेबारा हजार कोटी खर्चून मुंबईच्या ड्रिम प्रोजेक्टची उभारणी केली जात आहे. कोस्टर रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोस्टल रोडचं 82.5 टक्के काम पूर्ण झालं आहे तर बहूतांश कां हे बाकी आहे.

  • 13 Dec 2023 10:07 AM (IST)

    Maharashtra News : हे ताणाशाही प्रवृत्तीचं सरकार- नाना पटोलो

    हे ताणाशाही प्रवृत्तीचं सरकार आहे असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्यामध्ये सरकारचा हात असलल्याचे नाना पटोले म्हणाले. मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेल्या पापाचा वाटेकरी भाजप आणि राज्य सरकार आहे असंसुद्धा ते म्हणाले.

  • 13 Dec 2023 09:55 AM (IST)

    अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव

    अभिनेता साहिल खानने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खान आरोपी आहे.

    मुंबई पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामीनाला विरोध दर्शवला आहे.

  • 13 Dec 2023 09:49 AM (IST)

    विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, धक्कादायक अहवाल

    विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता आहे.

    लाडूसंदर्भात हिवाळी अधिवेशनात लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. लाडू तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • 13 Dec 2023 09:36 AM (IST)

    मलिकांबाबत फडणवीसांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पत्र पाठवलं – अजित पवार

    मलिकांबाबत फडणवीसांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पत्र पाठवलं , पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.

    मलिक यांना जेलमध्ये जावं लागल्याने सत्तेत त्यांना न घेण्याची भाजपची भूमिका आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

  • 13 Dec 2023 09:31 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूरहून भोपाळला रवाना झाले आहेत. मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील भोपाळसाठी रवाना झाले आहेत.

  • 13 Dec 2023 09:23 AM (IST)

    नाशिक – रहिवासी परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण

    नाशिकच्या पाईपलाईन रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. रहिवासी परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाची टीम दाखल झाली आहे. एका बंगल्यात बिबट्या शिरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 13 Dec 2023 09:13 AM (IST)

    भारतातील इतर शहरांपेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये पुणे ठरले अव्वल

    भारतातील इतर शहरांपेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये पुणे अव्वल ठरले आहे. सर्वोत्तम जीवन गुणवत्तेत पुण्यनगरीने पहिला क्रमांक पटकावला आहे. पुण्यानंतर हैदराबाद हे भारतातील सर्वोत्तम शहर ठरलंय. मर्सर संस्थेच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स मध्ये पुण्याने पहिला क्रमांक पटकावला, जगभरातील 500 शहरांचा डेटा गोळा करत मर्सरने सर्व्हे केला.

  • 13 Dec 2023 08:43 AM (IST)

    Live Update : राज्यातील परिचारिकांचा उद्यापासून बेमुदत संप

    राज्यातील परिचारिकांचा उद्यापासून बेमुदत संप… निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि निवृत्तीचे वय वाढवण्यासाठी महाराष्ट्र गोव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा 14 डिसेंबर पासून बेमुदत संप… राज्यातील विविध रुग्णालयातील नर्सेस उद्यापासून संपावर… पुणे जिल्ह्यातील 1000 नर्सेस जाणार संपावर… पुण्यातील ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील होणार आंदोलनात सहभागी

  • 13 Dec 2023 08:40 AM (IST)

    Live Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला

    पुण्यात थंडीचा कडाका वाढला… पुणे शहराचे तापमान १४ अंश सेल्सिअस डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता… पुढील पाच-सहा दिवसात पुणे शहराच्या तापमानात होणार मोठी घट हवामान खात्याचा अंदाज… सध्या पुणे शहरातलं तापमान 15.7 अंश सेल्सियस डिग्री

  • 13 Dec 2023 08:30 AM (IST)

    Live Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, सात आरोपींना आतापर्यंत अटक

    ललित पाटील ड्रग्ज प्रकरण,एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक… नाशिक पोलिसांच्या तपासात अनेक धक्कदायक गोष्टी उघड… नाशिकमध्ये कारखाना सुरू करण्याचा प्लॅन पुण्याच्या जेलमध्ये आणि ससून हॉस्पिटलमध्येच केला तयार… ललित पाटील याने आपला भाऊ भूषण पाटील याला ड्रग्ज तयार करणाऱ्या व्यक्तीशी दिली ओळख करून…

  • 13 Dec 2023 08:16 AM (IST)

    Live Update : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मोठी अपडेट समोर, मालकाच्या अडचणीच वाढ

    महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

  • 13 Dec 2023 08:06 AM (IST)

    Live Update : ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन

    ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं आहे.

  • 13 Dec 2023 07:57 AM (IST)

    नमामि गोदा प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण पूर्ण

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प नमामि गोदा प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.  २७८० कोटींचा सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी आराखडा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. या योजनेंतर्गत तपोवन आणि आगरटाकळी येथे दोन एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत.

  • 13 Dec 2023 07:55 AM (IST)

    परिचारिका राज्यव्यापी आंदोलन करणार

    राज्यभरातील रुग्णालयांच्या परिचारिकांचं 14 डिसेंबरपासूनराज्यव्यापी आंदोलन होणार आहे.  विविध मागण्यांसाठी राज्यभरातील रुग्णालयांमधील परिचारिका संपावर जाणार आहेत. पुण्यातील ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील  आंदोलनात सहभागी होणार आहेत. निवृत्ती वेतनाचा लाभ आणि निवृत्तीचे वय वाढवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचा 14 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. पुण्यातील 1000 हुन अधिक नर्सेस संपावर जाणार आहेत.  सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची परिचारिकांची मागणी आहे.  जिल्हा आरोग्य प्रशासन करणार पर्यायी व्यवस्था अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.

  • 13 Dec 2023 07:53 AM (IST)

    उत्पादन शुल्क विभागाचा हॉटेल आणि पबला दणका

    पुण्यात उत्पादन शुल्क विभागाचा हॉटेल आणि पबला दणका दिला आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा हॉटेल आणि पब वर करण्यात आली दंडात्मक कारवाई होणार आहे.  रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असताना देखील नियम दौलत उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यात आले होते. पुणे शहरात अद्जोत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर कारवाई होणार आहे.

  • 13 Dec 2023 07:50 AM (IST)

    जानेवारीपासून नाशिक शहरात २० टक्के पाणीकपात होणार?

    जानेवारीपासून नाशिक शहरात २० टक्के पाणीकपात होणार? ‘चर खोदा, अथवा पाणीकपात करा’, जलसंपदा विभागाचे महापालिकेला पत्र लिहिलं आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील ६०० दलघफू मृत जलसाठा वापरण्यास परवानगी… मृत जलसाठा वापरण्यासाठी गंगापूर धरणात खोदावे लागणार चर, अन्यथा पाणीकपातीचं संकट आहे. नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट येणार, की टळणार?

  • 13 Dec 2023 07:42 AM (IST)

    सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात

    पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होणार आहे.  आजपासून पुण्यात 69 वा सवाई गंधर्व महोत्सव सुरु होणार आहे. सनई वादनाने होणार गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. 13 डिसेंबर पासून 17 डिसेंबरपर्यंत  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात पार पडणार आहे. यंदा महोत्सवात जुन्या नव्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल.

  • 13 Dec 2023 07:37 AM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भोपाळला जाणार

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह एकूण 12 जण आज सकाळी 9 वाजता नागपूरहून भोपाळला रवाना होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 नंतर नागपूरला पुन्हा परतणार आणि विधानभवनाच्या कामकाजात सहभागी होणार

Published On - Dec 13,2023 7:33 AM

Follow us
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.