Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, २० विधेयक मांडली जाणार
Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल.
LIVE NEWS & UPDATES
-
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थकांचे छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन…
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात असून अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
-
राज्यात गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी – नाना पटोले
परभणी, बीडमधील घटना सरकार आल्यानंतर घडल्या आहेत, गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी – नाना पटोले यांची मागणी
-
-
Maharashtra News: परभणीतील आंदोलन दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात पडसाद
परभणीतील आंदोलन दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात पडसाद… कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन… न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या… या मागणीसाठी आंदोलन
-
Maharashtra News: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत
आज अधिवेशनाचा पहिला दिवस.. पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले… विधान परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढण्यात आली आहे… सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार बाय सहा अशी रांगोळी साकारण्यात आली… माहिती सरकार मधली ही महत्वकांक्षी योजना आहे..
-
Maharashtra News: बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी… सुप्रिया सुळे
बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी… कोठडीतील सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी चौकशी व्हायला हवी… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे…
-
-
Maharashtra News: परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण
सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन सुरू… परभणीत आज दुपारी होणार अंत्यसंस्कार… बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीसाठी राहणार उपस्थित… घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू… घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त…
-
संजय कुटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक
बुलढाणा : भाजपा नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच करणार आहेत. आमदार संजय कुटे पाच वेळा निवडून आले तरी मंत्रिपद न मिळाल्याने जळगांव जामोद मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
-
-
रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी दोन मंत्रिपदे
रत्नागिरी- जिल्ह्यात तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रीपदे मिळाली आहे. १९९५ साली रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मंत्री पदे मिळाली होती. मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळामध्ये रविंद्र माने आणि रामदास कदम या दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर आता तब्बल २९ वर्षांनी उदय सामंत आणि योगेश कदम यांच्या रुपाने दोन मंत्रीपद मिळाली आहेत.
उदय सामंत यांनी चौथ्य़ांदा घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आता पालकमंत्री कोण याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. खासदार भाजपचा असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवणार की शिवसेनेला देणार यासाठी चढाओढ लागली आहे.
-
राज्यात बिनखात्याचे सरकार, संजय राऊतांचा घणाघात
राज्यात बिनखात्याचे सरकार आहे. मंत्रिपदाचा फॉर्म्युला ६-६ महिन्यांचा करायला हवा. ज्याला त्याला कर्माची फळं नक्की मिळतात. छगन भुजबळांना वगळणयामागे जातीचं राजकारण आहे, असे संजय राऊत म्हणाले.
-
आज हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडली जाणार
Maharashtra Assembly Winter Session Live : आज होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
-
लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवर चर्चा होणार
Maharashtra Assembly Winter Session Live : महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा केली जात आहे.
-
फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन गाजणार
Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.
Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल. आज सभागृहात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. तसेच विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यासोबतच आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published On - Dec 16,2024 8:49 AM