Maharashtra Breaking News in Marathi : पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी, कॉल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

| Updated on: Feb 17, 2024 | 7:17 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 16 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी, कॉल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
Follow us on

मुंबई, दि. 16 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौरा करत आहेत. बारामतीत त्यांच्या उपस्थितीत बुथ कमिटी मेळावा पार पडणार आहे. महानिर्मितीचा गेल्या सहा वर्षांतील वीजनिर्मितीचा उच्चांक झाला आहे. यंदा जानेवारीत राज्यात सर्वोच्च ५,०६१ दशलक्ष युनिट्स इतकी औष्णिक वीजनिर्मिती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल विधासभा अध्यक्षांकडून आल्यानंतर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Feb 2024 08:59 PM (IST)

    डोंगरीत रायफल घेऊन काही दहशतवादी घुसल्याचा मुंबई पोलिसांना फेक कॉल

    मुंबई | डोंगरीतल्या बाबा मस्जिदमध्ये रायफल घेऊन काही दहशतवादी घुसल्याचा मुंबई पोलिसांना फेक कॉल आला. कॉल आल्यावर पोलिसांनी तपासणी केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही. कॉल करणाऱ्या ८३ वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीसीओ बुथवरून कॉल केला होता. भगवान रामचंद्र भापकर या ८३ वर्षीय इसमास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

  • 16 Feb 2024 08:22 PM (IST)

    ‘लवकरात लवकर तारीख द्या’, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात मागणी

    मुंबई | अजित पवार विशेष अधिवेशन आणि अर्थ संकल्पीय अधिवेशनात व्हिपचा वापर करू शकतात. शरद पवार गटाच्या विरोधात व्हिप वापरून संभ्रम तयार करू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर तारीख द्या, अशी मागणी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.


  • 16 Feb 2024 07:25 PM (IST)

    भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढला

    रत्नागिरी : निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातील समर्थकांमधील दगडफेकीनंतर चिपळूण पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. दोन गटातील दगडफेकीनंतर संभाव्य परिस्थिती हाताळताना तीन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस फौजफाट्यासह पंचनामासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढला.

  • 16 Feb 2024 06:57 PM (IST)

    धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड

    पुणे | पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड मध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यासह मुंबईत देखील बॉम्बस्फोट घडवण्याची कॉल करणारा माथेफिरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून अटक कण्यात आली आहे. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

  • 16 Feb 2024 06:25 PM (IST)

    देशात मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येईल, मुरली देवरा यांना विश्वास

    मुंबई | लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनं काम करू आणि मोदीजींचं व्हिजन पूर्ण करू. तसेच देशात मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येईल, असा विश्वास मुरली देवरा यांना व्यक्त केला आहे.

    मुरली देवरा काय म्हणाले?

    लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक येईल त्यातही आम्ही ताकतीने काम करू पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. आज देशात 2 राजकीय पक्ष आहे. केंद्रात भाजप आणि महाराष्ट्रात शिंदे साहेबांची शिवसेना. ही डेमोक्रॅटिक पार्टी आहे. पूर्वी काँग्रेसने आता शिवसेनेचे अधिवेशन मी सहभागी झालेलो आहे

  • 16 Feb 2024 06:17 PM (IST)

    भाजप नेतृत्वानं टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवणार : हर्षवर्धन पाटील

    नवी दिल्ली | राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करीन असं भाजप नेतृत्वानं जो विश्वास टाकला तो सार्थ करून दाखवणार, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया देत आभार मानले.

  • 16 Feb 2024 05:52 PM (IST)

    रशियन नेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात मृत्यू! पुतिन यांचे होते कट्टर विरोधक

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यमालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

  • 16 Feb 2024 05:35 PM (IST)

    हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट

    नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याचे नवनिर्वाचित मंडळाने अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

  • 16 Feb 2024 05:25 PM (IST)

    मुझफ्फरनगरमध्ये टायमर बॉम्बसह तरुणाला अटक

    उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एसटीएफने टायमर बॉम्बसह एका तरुणाला अटक केली आहे. एटीएसचे पथक अटक करण्यात आलेल्या तरुणाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आरोपी तरुण जावेदकडून चार टायमर बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. बॉम्ब निकामी करण्यासाठी मेरठहून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

  • 16 Feb 2024 05:10 PM (IST)

    मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. उद्यापासून सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होणार असून, विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

  • 16 Feb 2024 04:00 PM (IST)

    आता हाच काँग्रेसचा नारा -राहुल गांधी

    द्वेषाच्या वातावरणात प्रेमाची दुकान सुरु करा, आता हाच काँग्रेसचा नारा असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

  • 16 Feb 2024 03:48 PM (IST)

    शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक

    शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये मंत्री पियुष गोयल आणि अर्जुन मुंडा उपस्थित आहे. कृषी मंत्रालयातील अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. राजधानी दिल्ली जवळ एमएसपी च्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

  • 16 Feb 2024 03:45 PM (IST)

    महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

    शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहे. कार्यालयाबाहेर फुलाची सजावट करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर गर्दी जमली आहे. तर कार्यकर्त्यांची गर्दी पाहताच पोलिसांनी ही ॲक्शन मोडवर येत कल्याण कोळशेवाडी परिसरात पोलीस बंदोबस वाढवला आहे.

  • 16 Feb 2024 03:36 PM (IST)

    आमदार धस यांच्या घरासमोर आंदोलन

    बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन सुरु आहे. आष्टीत आमदाराच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे यांना साथ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

  • 16 Feb 2024 03:23 PM (IST)

    राहुल नार्वेकर यांचा पुतळा जाळला

    जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 16 Feb 2024 03:12 PM (IST)

    महाविकास आघाडीला आव्हान

    छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला. मी लाचारी दाखवणार नाही.मात्र आजही त्यांना सांगतो भाजपला हरवायच असेल तर एम आय एम लां हलक्यात घेऊन नका, असा इशारा त्यांनी दिला. सर्व राजकीय पक्षच अजेंडा आहे.प्रकाश आंबेडकर यांना काय पाहिजे मी कसं सांगणार मात्र मी कुणाच्या दरात उभे राहून जागा मागणार नाही. माझा एवढा आत्मविश्वास असेल तर ते तुम्हाला निवडणुकीनंतर कळेल, आमची प्लॅनिंग झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • 16 Feb 2024 03:01 PM (IST)

    मराठा बांधवांकडून आंदोलन

    सोलापुरात सर्वपक्षीय आमदारांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून आंदोलन करण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आजच्या आज सुटावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांचे कार्यक्रम उद्यापासून बंद पाडण्याचा इशारा दिला. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख तसेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलक एकवटले. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

  • 16 Feb 2024 02:49 PM (IST)

    महेश गायकवाड यांचा आज डिस्चार्ज नाही

    शरीरावर सूज असल्यामुळे त्यांना चालताना त्रास होत आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात येणार नाही. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर राहुल पाटील यांना आज सायंकाळी किंवा उद्यामध्ये डिस्चार्ज देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • 16 Feb 2024 02:44 PM (IST)

    सर्किट हाऊसला मराठा समाजासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

    कोल्हापूर : सर्किट हाऊसला मराठा समाजासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. बैठकीला सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील समन्वयक मोठ्या संख्येने हजर आहेत. जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या मागितले आहेत त्या पूर्ण कराव्यात केली मागणी.

  • 16 Feb 2024 02:27 PM (IST)

    काँग्रेसला मराठा आरक्षण नको आहे- उदय सामंत

    उदय सामंत

    मराठा आरक्षणाच्या बाबत नाना पटोले शंका उपस्थित करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे काँग्रेसला मराठा आरक्षण नको आहे. आजूबाजूला चौकशी केली तरी समाजाची स्थिती समजू शकेल. आयोगाला देखील एक वेगळं स्थान आणि महत्त्वाचा दर्जा आहे. त्यावर शंका घेऊन काँग्रेस आपली भूमिका पुढे करत आहे. अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे.

  • 16 Feb 2024 02:26 PM (IST)

    आमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याचा प्रश्नच नाही – उदय सामंत

    मुंबई : आमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याचा प्रश्नच नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच काल त्याचे उत्तर दिलंय. त्यामुळे अशा बातम्या ना पूर्णविराम मिळाला पाहिजे. शिबिराला सुरवात तर झाली आहे. काही पक्षप्रवेश होण अपेक्षित आहे. शिवाजी पार्कवर सभा घेणाऱ्यांना आता रस्त्यावर सभा घ्यावा लागत आहेत. त्यामुळे माझ्यावर कितीही टीका केली तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

  • 16 Feb 2024 01:54 PM (IST)

    मनसेचा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये होणार

    येत्या 9 मार्च रोजी मनसेच्या नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे. नाशिकच्या मनसे नेत्यांच्या कोअर टीमने राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेत केली मागणी.

  • 16 Feb 2024 01:08 PM (IST)

    अधिसूचनेची 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा – जरांगे पाटील

    सगेसोयरे अधिसूचनेची येत्या 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी केली जावी अशी मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

  • 16 Feb 2024 12:50 PM (IST)

    शिंदे गटाचं आजपासून महाअधिवेशन

    “महाअधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा होईल. कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले देणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार आधीपासूनच सकारात्मक आहे. अधिवेशनात मागास वर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा होईल. ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 16 Feb 2024 12:40 PM (IST)

    श्वानाला मारहाणप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

    ठाण्यातील वेटिक या पशू चिकित्सालयातील कर्मचाऱ्यांनी एका श्वानाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याप्रकरणी श्वानाला मारहाण करणारे कर्मचारी आणि वेटिक चिकित्सालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 16 Feb 2024 12:30 PM (IST)

    यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी

    यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. वर्षभरातील 15 दिवस सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते. त्यापैकी 13 दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली.

  • 16 Feb 2024 12:20 PM (IST)

    नवी दिल्ली- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राजधानी दिल्लीत दाखल

    नवी दिल्ली- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

  • 16 Feb 2024 12:10 PM (IST)

    नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनात पहिला मृत्यू

    नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनात पहिला मृत्यू झाला आहे. शंभू सीमेवर ज्ञानसिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तो गुरुदासपूरच्या चाचौकी गावचा रहिवासी होता. गावचे सरपंच जगदीश सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अश्रुधुराच्या गोळ्या लागल्याने ज्ञानसिंग यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    ज्ञानसिंग 11 फेब्रुवारी रोजी किसान मजदूर संघर्ष समितीच्या गटासह शंभू सीमेवर गेले होते. 14 फेब्रुवारी रोजी अश्रूधुराच्या नळकांड्याने तो जखमी झाला होता.

  • 16 Feb 2024 11:57 AM (IST)

    Live News : सोलापुरात सर्वपक्षीय आमदारांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून आंदोलन सुरु

    सोलापुरात सर्वपक्षीय आमदारांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून आंदोलन सुरु… भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर मराठा आंदोलक एकवटले… सकल मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी आमदार विजयकुमार देशमुखांच्या घराबाहेर जमले

     

  • 16 Feb 2024 11:45 AM (IST)

    Live News : काँग्रेस पक्षाचा केंद्र सरकारवर मोठा आरोप

    काँग्रेस पक्षाचा केंद्र सरकारवर मोठा आरोप… काँग्रेस पक्षाचे बँक अकाउंट फ्रिज केल्याचा आरोप… 220 कोटी रुपये आयकर भरावा लागणार… काँग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप

     

  • 16 Feb 2024 11:35 AM (IST)

    Live News : सरकारनं कुणबीकरण थांबवावं – छगन भुजबळ

    सरकारनं कुणबीकरण थांबवावं… सर्वच ओबीसीत आले तर तथं कोण राहणार. खोट्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र वाटप… खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्यात आले… असं वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केलं आहे.

  • 16 Feb 2024 11:25 AM (IST)

    Live News : मराठा समाजाला निश्चितच सरकार आरक्षण देईल – हसन मुश्रीफ

    मराठा समाजाला निश्चितच सरकार आरक्षण देईल… 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यात हा प्रश्न मार्गी लागेल… पालकमंत्री म्हणून अनेक प्रश्न मुख्यमंत्री यांच्या सोबत मांडत आहे… त्यांचा हा दौरा यशस्वी होईल… महालक्ष्मी आणि जोतिबा तीर्थक्षेत्र आराखडा हा प्रश्न मार्गी लागेल… हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

  • 16 Feb 2024 11:06 AM (IST)

    Live News : सयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दर्यापूर बंदचे आवाहन

    अमरावती | सयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दर्यापूर बंदचे आवाहन… दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन सुरू… शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू… दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठींबा… सोयाबीन, कापूस,संत्रा,चना व कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी

  • 16 Feb 2024 10:59 AM (IST)

    अमरावती – संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दर्यापूर बंदचे आवाहन

    अमरावती  – संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दर्यापूर बंदचे आवाहन.  दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.

    शेतकरी नेते अभय गावंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या उपस्थित विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे.  दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठींबा दर्शवला आहे.  सोयाबीन, कापूस,संत्रा,चना व कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.

  • 16 Feb 2024 10:46 AM (IST)

    जालना – न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जरांगेवर कालपासून वैद्यकीय उपचार, आजही लावण्यात आले सलाईन

    जालना, अंतरवाली सराटी –  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील यांनीा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्यांनी कालपासून वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात केली. आणि आजही जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचार देत सलाईन लावण्यात आले आहे.

  • 16 Feb 2024 10:22 AM (IST)

    कल्याण शीळ रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    कल्याणच्या  पत्रिपूल परिसरात ट्रक बंद पडल्याने व गार्ड सर्कल जवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.  गेल्या अर्ध्या तासा पासून झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पुलाजवळ अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे.  मात्र विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकामुळे पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यास त्रास होत आहे.

  • 16 Feb 2024 10:10 AM (IST)

    दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्यायसुरू आहे – संजय राऊत

    दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. शेतकरी आंदोलनात महाराष्ट्र योगदान देणार. शेतकरी नेत्यांशी शिवसेनेचा संपर्क सुरू आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

  • 16 Feb 2024 10:05 AM (IST)

    सरकार जनतेला फसवत आहे – नाना पटोले

    सरकार जनतेला फसवत आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको.

  • 16 Feb 2024 09:40 AM (IST)

    अधिवेशनात अहवालावर चर्चा होणार- मुख्यमंत्री शिंदे

    मराठा आरक्षणसाठी मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केला आहे. या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 16 Feb 2024 09:29 AM (IST)

    पहिल्यांदाच इतका मोठा सर्वे करण्यात आला आहे

    मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेला सर्वे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वे असल्याचं आयोगानं सांगितलं. याशिवाय तीन ते चार लाख लोकांना मिळून हा सर्वे केला असल्याचं ते म्हणाले.

  • 16 Feb 2024 09:24 AM (IST)

    ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार- मुख्यमंत्री शिंदे

    मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 16 Feb 2024 09:21 AM (IST)

    कुणबी नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

    कुणबी नोदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 16 Feb 2024 09:16 AM (IST)

    20 तारखेला विशेष अधिवेश बोलावण्यात आलं आहे- मुख्यमंत्री शिंदे

    मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला विशेष अधिवेश बोलावण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

  • 16 Feb 2024 09:08 AM (IST)

    आयोगाकडून जलदगतीनं अहवाल सादर- मुख्यमंत्री शिंदे

    मागासवर्ग आयोगानं रात्रंदिवस काम करून जलदगतीनं अहवाल सादर केला असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आयोगाचा अहवाल ठेवला जाईल असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 16 Feb 2024 08:23 AM (IST)

    Maratha Reservation | मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

    मागासवर्ग आयोगाचा अहवाल थोड्याच वेळात सादर होणार. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील राहणार उपस्थित. थोड्याच वेळात सुरू होणार पत्रकार परिषद.

  • 16 Feb 2024 08:20 AM (IST)

    Maratha Reservation | धाराशिव जिल्ह्यातील बससेवा बंद

    मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील बससेवा बंद. पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद. काल काही बसवर दगडफेक करण्यात आली. नंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील बस सेवा बंद राहणार.

  • 16 Feb 2024 08:13 AM (IST)

    Pune news | पुण्यात पहाटेपासून अपघातांची मालिका

    नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात. खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात. अनकेजण जखमी. वडगाव ब्रिज परिसरात दुसरा अपघात, तरुणाचा मृत्यू. हडपसर भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीची धडक. पादचारी गंभीर जखमी.

  • 16 Feb 2024 07:57 AM (IST)

    Marathi News | अजित पवारांचा बारामतीत बुथ कमिटी मेळावा

    अजित पवार यांचा बारामतीत बुथ कमिटी मेळावा होणार आहे. तसेच सुप्रिया सुळे बारामतीतील शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाच उद्घाटन होणार आहे. बारामतीत आज सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मेगा दौरा आहेत.

  • 16 Feb 2024 07:43 AM (IST)

    Marathi News | शिंदे गटाचे कोल्हापुरात आजपासून दोन दिवसीय महाअधिवेशन

    शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापुरात आजपासून दोन दिवसीय महाअधिवेशन होणार आहे. कोल्हापुरात अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशन परिसरात लागले बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटाऊत लागले आहे.

  • 16 Feb 2024 07:29 AM (IST)

    Marathi News | श्वानाला अमानुष मारहाण, दोघांना अटक

    घोडबंदर येथील वेटिक या पशू चिकित्सालयातील कर्मचाऱ्यांने एका श्वानाला अमानुष मारहाण केली. त्या
    मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी वेटिकचे कर्मचारी मयूर आढाव आणि प्रशांत गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले आहे.

  • 16 Feb 2024 07:15 AM (IST)

    Marathi News | महानिर्मितीचा वीजनिर्मितीचा उच्चांक

    महानिर्मितीचा गेल्या सहा वर्षांतील वीजनिर्मितीचा उच्चांक झाला आहे. गेल्या ६ वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा जानेवारीत राज्यात सर्वोच्च ५,०६१ दशलक्ष युनिट्स इतकी औष्णिक वीजनिर्मिती केली आहे. महानिर्मितीची जानेवारी २०२४ मध्ये ५,५८२ दशलक्ष युनिट्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली होती.